सिंधुदुर्ग today


नांदगाव येथील स्वामी समर्थ मठामध्ये १४ फेब्रुवारी रोजी पादुका पालखी सोहळा. 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील विठोबा रुक्मिणी स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ नांदगाव मधली वाडी येथे श्री अक्कलकोट स्वामी महाराज चरण पादुका पालखी सोहळा शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. 

        या निमित्ताने सकाळी १० ते ४ पर्यंत दर्शनासाठी तसेच आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.श्रींच्या दर्शनासाठी इच्छा असूनही ज्या भक्तांना स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे जाता येत नाही अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामींची पादूका पालखी आपल्या गावी येत आहे.तरी सर्व भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today