रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न. वैभववाडी (ऋषिकेश मोरजकर ) वैभववाडी रेल्वे स्टेशन हे प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वाचे स्टेशन आहे. या स्टेशनवरुन वैभववाडीसह देवगड व गगनबावडा तालुक्यातील प्रवासी प्रवास करतात. या स्टेशन वरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांची लवकरच भेट घेणार आहे. याठिकाणी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. वैभववाडी रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, नासीर काझी, अरविंद रावराणे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, प्राची तावडे, नेहा माईणकर, शारदा कांबळे, रोहन रावराणे, अतुल सरवटे, संजय सावंत, प्रकाश पाटील, प्रकाश सावंत, देवानंद पालांडे, रेल्वे अधिकारी श्री बापट, पीआरओ सचिन देसाई, व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नितेश राणे म्हणाले, ...