सिंधुदुर्ग today
नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथ दिवे दुरुस्ती करण्याचा फक्त दिखावा का ? संबंधित कंपनी ने तोंडाला पुसली पाने
१५ ऑगस्ट ला आंदोलन होणार म्हणून १४ ऑगस्ट पर्यंत दुरुस्ती करण्याचा केविलवाणा प्रयत्न ; पण पथदिवे काही केले सुरू होईनात.
गणेश चतुर्थी कालावधीत संपूर्ण परिसरात अंधार
कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली तालुक्यातील नांदगाव मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा ब्रिज खाली जवळपास २० ते २५ गावाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून ही या ब्रिज जवळील भागात स्ट्रीट लाईट डिसेंबर च्या अपघातानंतर बंदच असल्याने १५ ऑगस्ट पर्यंत सुरळीत न केल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनीच आंदोलन करण्याचा इशारा नांदगाव येथील ग्रामस्थांनी दिला होता. मात्र या वृत्ताने संबंधित विभागाने जाग येत सदर आंदोलन होऊ नये म्हणून १५ ऑगस्ट ला आंदोलन होऊ नये म्हणून १४ ऑगस्ट पर्यंत क्रेन च्या सहाय्याने दुरुस्ती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला . मात्र शेवटपर्यंत पथदिवे सुरू करण्यात संबंधित विभागाला यश आलेच नाही. यामुळे श्री गणेश चतुर्थी कालावधी मध्ये संपूर्ण अंधार झाला आहे. गणेश भक्तांमधून नाराजी व्यक्त केली जात असून सर्वसामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा