सिंधुदुर्ग today


नांदगाव उर्दू शाळेच्या वतीने काढण्यात आली तिरंगा रॅली. 

भारत माता की जय ... जय जवान जय किसान ... घोषणांनी परिसर गेला दणाणून 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

१५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसभेला हर घर तिरंगा अंतर्गत नांदगाव तिठा येथील उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने नांदगाव तिठा बाजारपेठेतून तिरंगा रॅली काढण्यात आली. भारत माता की जय, जय जवान जय किसान , वंदे मातरम् आदी घोषणा देत हातात तिरंगा घेत तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यासीन बटवाले,उपाध्यक्ष रजिया सारवान ,सचिव मुश्ताक कित्तूर सर, शिक्षण तज्ञ् फातिमा बटवाले, शिक्षक आयनुद्दीन शेख, सदस्य यास्मिन बटवाले,आशिफा लांजेकर,फरहत बटवाले,अल्ताज हवालदार, वासिम बटवाले, सर्फराज बटवाले, रिक्षा संघटना अध्यक्ष विलास कांडर, रहिमान पाटणकर, जाफर कुणकेरकर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today