सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे पडलेल्या हायवे वरील खड्यांना वाली कोण ?

रात्री पुन्हा चार दुचाकी खड्यात धडकल्या.

हायवे प्राधिकरण व कंपनी सुस्त ; अजून किती अपघातांची वाट बघत राहणार.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव केंद्र शाळा नंबर १ नजिक तेली यांच्या घरासमोर असलेल्या हायवे वरील खड्डयात दुचाकी आदळून काल रात्री ७.३० च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरुन प्रवास करणारे जखमी झाले असून त्याच ठिकाणी पुन्हा रात्री चार दुचाकीस्वार खड्यांचा अंदाज न आल्याने पडले असल्याचे जवळच राहत असलेले रुग्ण वाहिकेचे चालक पांडू तेली यांनी सांगितले आहे.  नांदगाव येथील हायवेवर पडलेल्या खड्यांना वाली कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. नांदगावातील कुठलीच गोष्ट हायवे कंपनी तसेच प्राधिकरण जबाबदाराने घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे बंद असलेल्या सर्व स्ट्रीट लाईट गणेश चतुर्थी अवघ्या चार दिवसांवर आली तरीही त्यांचे स्ट्रीट लाईट चालू होतं नाहीत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today