सिंधुदुर्ग today
नांदगाव ग्रा.पं. येथे व्यापारी, रिक्षा , मॅजिक संघटनांची गणेश चतुर्थी अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न.
आम्ही सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा - सरपंच भाई मोरजकर यांचे सर्व व्यावसायिकांना आवाहन.
१८ ऑगस्टला नांदगाव तिठा येथे स्वच्छता अभियान
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. अशावेळी श्री गणेश चतुर्थी अवघ्या वीस दिवसांवर आल्याने नांदगाव बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडी तसेच रिक्षा मॅजिक व्यापारी यांची संयुक्त बैठक नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सरपंच भाई मोरजकर बोलताना म्हणाले की , श्री गणेश चतुर्थी ला सुस्थितीत नियोजन होण्यासाठी आम्ही सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन व्यापारी , रिक्षा, मॅजिक संघटनांनी करावे आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी उपसरपंच इरफान साठविलकर , ग्रामपंचायत अधिकारी आर.डी. सावंत, व्यापारी संघटना प्रभारी अध्यक्ष रज्जाक बटवाले, सचिव ऋषिकेश मोरजकर, रिक्षा संघटनेचे संजय पाटील, इक्बाल बटवाले, किशोर मोरये, गुरु साळुंके, मॅजिक संघटनेचे अल्लाउद्दीन बोबडे, मुस्ताक बोबडे, बाळा सातोसे, मुस्ताक नावलेकर, कमलाकर महाडिक, प्रदीप हरमलकर, राजा म्हसकर, राजू तांबे, अनिकेत तर्फे, तानाजी वाळके आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये श्री गणेश चतुर्थी पूर्वी व गणेश चतुर्थी मध्ये ब्रिज खालील वाहनांची पार्किंग करताना एसटी वाहतूक ,तसेच कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी,रिक्षा व्यवसायिक यांनी ही रिक्षा लावताना व्यापारी तसेच इतर वाहनांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे व्यापारी वर्गाने आपल्याकडून होत असलेल्या विक्रीमुळे कचऱ्याचे प्रदूषण होऊ नये याकडे विशेष लक्ष देऊन स्वच्छता पाळावी, तसेच व्यापाऱ्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणी कचऱ्याच्या डजबीन ठेवल्या जातील या डसबिनमध्येच सदर व्यापाऱ्यांनी कचरा टाकावा तसेच आपल्याकडे येत असलेल्या गिऱ्हाईकाला तशा सूचना देण्यात यावी. असे ठरविण्यात आले असून. रविवारच्या आठवड्या बाजारादिवशी बाजाराला येणाऱ्या व्यापाऱ्यांना नांदगाव फोंडा रस्त्यावर बाजार भरतो अशा ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होणार नाही अशा प्रकारे नियोजन करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगितले आहे.
नांदगाव ग्रामपंचायत तसेच नांदगाव व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने नांदगाव तिठा बाजारपेठ मधील स्वच्छता अभियान सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे तरी सर्वांनी या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा