सिंधुदुर्ग today



मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नांदगाव येथे दुचाकीचा अपघात.

जखमींना नांदगाव आरोग्य केंद्र येथे उपचार करुन अधिक उपचारासाठी कणकवलीत दाखल 

हायवे प्राधिकरण व कंपनी चे दुर्लक्ष ; ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया.

नरेंद्र महाराज रुग्ण वाहिकेची नांदगाव येथे सेवा. 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव केंद्र शाळा नंबर १ नजिक तेली यांच्या घरासमोर असलेल्या हायवे वरील खड्डयात दुचाकी आदळून आज रात्री ७.३० च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरुन प्रवास करणारे जखमी झाले असून त्यांच्या वर तातडीने नरेंद्र महाराज रुग्ण वाहीकेतून पांडू तेली यांनी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. व अधिक उपचारासाठी कणकवलीत दाखल करण्यात आले आहे.

    दरम्यान या हायवे प्राधिकरण व कंपनी चे या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गणेश चतुर्थी अवघ्या एक आठवड्यावर आल्याने या हायवे वर वाहनांची गर्दी होणार आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today