सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील हायवेला खड्डे पडलेल्या ठिकाणी हायवे उप अभियंता कुमावत यांनी केली पाहणी.
खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी.
केसीसी कंपनी देखभाल दुरुस्ती साठी टाळाटाळ करत असल्याने चेंडू पालकमंत्री नितेश राणेंच्या कोर्टात.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव गावामध्ये महामार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे काल एक दुचाकीचा अपघात झाला होता त्यामध्ये देवगड शिरगाव येथील एक दांपत्य गंभीर जखमी झाले.याबाबत सिंधुदुर्ग today न्यूज चॅनल ने बातमी प्रसिद्ध केली होती. या पाश्र्वभूमीवर आज खारेपाटण चे उप अभियंता कुमावत यांचेशी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी संपर्क करून नांदगाव येथे येऊन पाहणी करावी अशी सूचना केली.तसेच इतरही प्रलंबित कामाबाबत संबंधित के सी सी कंपनी गांभीर्याने लक्ष देत नाही.प्रत्येक कामात टाळाटाळ चालू आहे,ब्रीज वरील स्ट्रीट लाईट,तसेच एस.टी स्टॉप वरील हाय मास्ट कित्येक दिवस बंद आहेत. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या जवळ सर्व समस्या मांडणार असल्याचे नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा