सिंधुदुर्ग today
वैभववाडीत उद्या फुटणार एक लाखाची हंडी.
बिगबाॅस विजेते शिव ठाकरे राहणार उपस्थित.
भाजपा वैभववाडीचे आयोजन.
ऋषिकेश मोरजकर|वैभववाडी
भाजपा वैभववाडी यांच्या वतीने दहीहंडी उत्सव २०२५ चे शनिवार दि १६ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवात बिगबॉस थ्री चे विजेते शिव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ. प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित राहणार आहे. दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकाला रोख रुपये १ लाख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना आकर्षक चषक व रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हातील गोविंदा पथक या उत्सवात भाग घेऊ शकतात. यानिमित्त ऑर्केस्ट्रा नटरंग होणार आहे. वैभववाडी येथील इनामदार प्लाझा येथे हा उत्सव संपन्न होणार आहे. तरी दोन्ही जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे. तसेच नागरिकांनीही उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा