सिंधुदुर्ग today


नांदगाव वरची वाडीतला गोविंदा पथक ने मिळालेली रक्कम दिली ; दुचाकी अपघात गंभीर जखमीच्या उपचारासाठी

गोविंदा पथकाचा अनोखा उपक्रम. 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव वरची वाडीतला गोविंदा पथक यांनी यावर्षी वरची वाडी ते नांदगाव तिठा पर्यंत फोडलेल्या दही हंडीतील मिळालेली रक्कम रोख ५००० /-  हजार रुपये नांदगाव सिसयेवाडीतील अपघात गंभीर जखमी होऊन कोल्हापूर येथे उपचार घेत असलेला विनोद दिवाकर मोरये यांच्या मदतीकरीता सुपुर्द करण्यात आले आहे. यामुळे या नांदगाव वरची वाडीतला गोविंदा पथक यांचे कौतुक होत आहे.

     या गोविंदा पथक यांनी मिळालेली सर्व रक्कम यातुन कुठल्याही प्रकारे मंडळासाठी खर्च न करता मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. या गंभीर जखमी असलेल्या तरुणाला लाखो रुपये खर्च होणार असल्याने बरेच छोटी मोठी मदत करीत असून वरची वाडीतला गोविंदा पथक ने ही खारीचा वाटा उचलला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today