पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव पंचक्रोशीतील हौशी दशावतार नाट्यप्रेमी आयोजित आज "भिषण स्वरूपी राजयक्ष्मा नाट्यप्रयोग" कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज सोमवार दिनांक  १ जुलै 2024 रोजी रात्रौ ठीक  ८ वाजता  नांदगाव पंचक्रोशीतील हौशी नाट्यप्रेमी आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत नावलौकिक प्राप्त तरुण पिढीतील अभ्यास निवडक कलाकारांच्या संयुक्त संचात महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग "भिषण स्वरूपी राजयक्ष्मा नाट्यप्रयोग" नांदगाव मधली वाडीच्या श्री महापुरुष सभागृह येथे सादर होणार आहे.  तरी सर्व नाट्यप्रसिरांनी या नाट्यप्रयोगाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेची सिंधुदुर्गात प्रभावी अंमलबजावणी करणार.! माजी जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंत यांची माहिती प्रतेक महिन्याला 1500 रुपये देणारी महायुती सरकारची ही योजना महिलांचे सक्षमीकरण करणारी भाजप नेते खासदार नारायण राणे,पालकमंत्री चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार  सिंधुदुर्गासाठी पाणबुडी प्रकल्प व स्कुबा ड्रायव्हिंग सेंटर हे पर्यटनासाठी पोषक प्रकल्प  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या  बँक खात्यात जमा होणारी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना ही, लाभार्थी महिलांना आधारवड ठरणारी योजना आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघा सह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थी महिलांपर्यंत पोचून या  शासनाच्या योजनेचा लाभ आम्ही मिळवून देणार आहोत. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे.अशा प्रत्येक महिलेला या योजनेत समाविष्ट करून घेणा...

सिंधुदुर्ग today

इमेज
महिलांना महिना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय हा क्रांतिकारी - नितेश राणे  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  सर्व समावेशक आणि सर्वच घटकांना न्याय देणारा आजचा आमच्या महायुती सरकारचा अर्थसंकल्प आहे. प्रत्येक बॉलवर सिक्स आमच्या सरकारने मारलेला आहे. महिला,माता भगिनी याना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील महिला भगिनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास बळ मिळेल.असा विश्वास भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.

सिंधुदुर्ग today

इमेज
रत्नागिरी ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेश चतुर्थी पर्यंत पूर्ण करा माजी केद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची  भेट घेत केली मागणी पत्रा देवी ते राजापूर दरम्यान महामार्गावर सुशोभीकरण करण्याची मागणी  महामार्ग प्रश्नावर दोन्ही नेत्यांमध्ये झाली सकारात्मक  चर्चा  खासदार झाल्यानंतर महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करणार असे राणेंनी दिले होते आश्वासन कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई,गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेश चतुर्थी उत्सवापर्यंत  पूर्ण व्हावे. तसेच पत्रादेवी ते राजापूर दरम्यान महामार्गावर सुशोभीकरण करावे अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली.   महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रलंबित असलेल्या कामासंदर्भात यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. प्रलंबित काम युद्धपातळीवर पूर्णत्वास नेण्यासं...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न  मुलांना आपले टॅलेंट सिद्ध करावयाचे असे वाटले तर त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणे गरजेचेेचे - प्रा.मोहन कुंभार  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगाव आणि नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था नांदगाव  तसेच सरस्वती हायस्कूल नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज  मान्यवरांच्या प्रमुुख उपस्थितीत संपन्न झाला.         यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात शालांत परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला.   सरस्वती हायस्कूल नांदगावच्या सभागृहात  कार्यक्रम आज संपन्न झाला.        यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोळंब उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये, संस्थेचे खजिनदार सुभाष बिडये प्रमुख  मार्गदर्शक  म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, संवादक प्रा. मोहन कुंभार, प्रसिद...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी अजय कांडर यांची कविता  नांदेड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आवानओल काव्यसंग्रहातील 'उंबरा ओलांडणाऱ्या बायका ' कवितेचा सन्मान कणकवली/प्रतिनिधी            स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या एफ.वाय.बीएच्या अभ्यासक्रमात कवी अजय कांडर यांच्या 'उंबरा ओलांडणाऱ्या बायका' या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. कवी कांडर यांच्या 'आवानओल' काव्यसंग्रहातील सदर कविता असून आजवर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या एकूण 13 अभ्यासक्रमांमध्ये आणि एका शालेय अभ्यासक्रमामध्ये कांडर यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी एम ए च्या अभ्यासक्रमातही त्यांच्या हिंदी भाषांतरित काव्यसंग्रहाचा समावेश करण्यात आला आहे.         कवी अजय कांडर यांना समकालीन मराठी कवितेच्या मुख प्रवाहातील महत्त्वाचे कवी मानले जातात. 90 नंतर लिहिणाऱ्या पिढीत ग्रामीण भागातून ज्या लोकांनी मराठीला सशक्त कविता दिली यात कवी अजय कांडर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. 2005 मध्ये शब्दालय प्रकाशनातर्फे त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या ' आव...

सिंधुदुर्ग today

इमेज
फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग आता नीलम विद्यापीठाशी संलग्न. कणकवली प्रतिनिधी  फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग हें कॉलेज फॅशन आणि इंटिरिअर डिझायनिंगसाठी व्यापक असे कार्य करित आहे.या कॉलेज च्या विविध शाखा देखील असून सर्वत्र असंख्य विदयार्थी यां कॉलेज मधून दर्जेदार शिक्षण घेतात.नुकतीच यां कॉलेज ला  नीलम विद्यापीठाची मान्यता मिळाली असून फ्लोरेट कॉलेज हे आता दिल्ली येथील नीलम विद्यापीठाशी संलग्न झाले आहे.कॉलेज च्या वाटचालीत हा एक मनाचा तुरा म्हणावा लागेल.यां विद्यापीठामुळे फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझाईनिंग ला एक मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.महाविद्यालयाला आता फॅशन डिझायनिंग आणि इंटिरिअर डिझायनिंगमध्ये बॅचलर ऑफ व्होकेशनल (बी.वोक) कार्यक्रम ऑफर करण्याची परवानगी मिळाली आहे,त्यामुळे डिझाइन शिक्षणातील चांगले काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. देशातील प्रमुख महाविद्यालयांपैकी  फ्लोरेट कॉलेज हें एक आहे.नेहमीच विद्यार्थ्यांना उत्तम असे शिक्षण आणि प्रशिक्षण यां कॉलेज मुळे मिळत आहे. नीलम विद्यापीठाशी झालेल्या संलग्नतेमुळे महाविद्यालयाला अधिक विश्वासार्हता आणि प्राव्हेह घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यां क्षे...

सिंधुदुर्ग today

इमेज
  कणकवलीत अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम "ही दोस्ती तुटायची नाय" पथ नाट्य सादर कणकवली (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे आज कणकवली पोलीस यांच्या वतीने कणकवलीत येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अनुषंगाने महाविद्यालय कणकवली येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.        सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवन केल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणाम बाबत माहिती देण्यात आली.        तसेच रंगखांब ग्रूप कणकवली यांचे पथनाट्य प्रयोग "ही दोस्ती तुटायची नाय" आयोजित करून अमली पदार्थ विरोधी जनजागृती केली.  सदर कार्यक्रमास कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी,पी.एस.आय. श्री.खरात  विद्यालयाचे प्राचार्य श्री महलिंगे व शिक्षक श्री भिसे यांचेसह 100 ते 125 विद्यार्थी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
कोकण पदवीधर मतदानाला सुरुवात  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)                      विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३४ मतदान केंद्रावर पदवीधर मतदार शांततेत ह्क्क बजावत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १८ हजार ५५१ मतदारांची अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात मतदार संख्या वाढल्यामुळे मतदान केंद्र ३१ इतकी निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी १८२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहेत.चोख पोलीस बंदोबस्तात ही निवडणूक पार पडत असून प्रत्येक मतदान केंद्रावर महायुती व महाविकास अघाडीचे बुध आहेत.या मतदारसंघातून एकूण १३ उमेदवार रिंगणात असून त्याचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. प्रामुख्याने महायुतीचे निरंजन डावखरे विरूद्ध महाविकास अघाडीचे रमेश किर याच्यात मुख्य लढत दिसून येत आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
जानवलीतील कवी सत्यवान साटम आणि कवी संदीप कदम यांचे काव्यवाचन कवी साटम, कवी कदम यांच्या कवितांचा 'सिंधुदुर्गची नवी कविता' काव्यग्रंथातही समावेश कणकवली/प्रतिनिधी              सिंधुदुर्गातील नव्या कवींच्या कवितांचा समावेश असलेल्या 'सिंधुदुर्गची नवी कविता'  या काव्यग्रंथाचे मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या समाज संवाद साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष समीक्षक प्रा.डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यात जाणवलीतील नवोदित कवी सत्यवान साटम आणि संदीप कदम यांच्या पाच कवितांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी राज्यस्तरावरच्या विविध मान्यवर कवींच्या सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात कवी साटम आणि कवी कदम यांनी आपल्या कविता सादर करून रसिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळवला.        'सिंधुदुर्गची नवी कविता' हा ग्रंथ कवी अजय कांडर यांच्या संकल्पनेतून प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेला असून या ग्रंथाचे संपादन समीक्षक प्रा. संजीवनी पाटील आणि कवी मधुकर मातोंडकर यांनी केले आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून कोकणबरोबर...

सिंधुदुर्ग today

इमेज
  आजच्या जमातवादाचा मुकाबला करण्यासाठी साने गुरुजी पुन्हा समजून घेणे आवश्यक 'साने गुरुजी समजून घेताना' व्याख्यानात ॲड. देवदत्त परुळेकर यांचे प्रतिपादन अभ्यासपूर्ण व्याख्यानाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली/प्रतिनिधी       साने गुरुजींच्या नावाने महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी वाचनालये, शाळा, उद्याने, रस्ते आहेत. परंतु साने गुरुजींचे अजरामर पुस्तक श्यामची आई व त्यावर निघालेला चित्रपट या खेरीज साने गुरुजींच्या अफाट कार्याची ओळख महाराष्ट्राला नाही.आजच्या जमातवादाचा मुकाबला करण्यासाठी साने गुरुजी पुन्हा समजून घेणे आवश्यक आहे.असे आग्रही प्रतिपादन साने गुरुजी जीवन चरित्राचे अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर यांनी "साने गुरुजी समजून घेताना" या व्याख्यानात केले.        समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅरिस्टर नाथ पै  सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनात ॲड. देवदत्त परुळेकर यांचे 'साने गुरुजी समजून घेताना ' या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष समीक्षक रणधीर श...

सिंधुदुर्ग today

इमेज
बेळणे येथे विद्यार्थ्यांना वही व दप्तर वाटप  नांदगाव प्रतिनिधी  श्री.पावणादेवी क्रिकेट मंडळ बेळणे खुर्द आणि नवनिर्वाचित सरपंच अविनाश गिरकर यांच्या माध्यमातून जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बेळणे खुर्द येथे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर तसेच सुमंत पावसकर आणि रोहन हडपत यांच्या मार्फत वही वाटप करण्यात आले... या वेळी सरपंच अविनाश गिरकर, पोलिस पाटील राजेंद्र चाळके, मुख्याध्यापिका सौ.सामंत मॅडम, प्रशालेचे शिक्षक वर्ग,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गणेश गिरकर, शिक्षण प्रेमी सत्यवान चाळके, क्रिकेट मंडळ अध्यक्ष अनिल चाळके, अंगणवाडी सेविका सौ.लक्ष्मीबाई चाळके, सुलोचना चाळके,सुहास मुणगेकर, उदय चाळके, अनिकेत चाळके, विशाल लाड, प्रकाश चाळके, किशोर चाळके दया चाळके, रोहन हडपत, सौ. स्वप्नाली चाळके आदी उपस्थित होते,..... श्री. राणे सर यांनी मानले श्री. पावणादेवी क्रिकेट मंडळ चे आभार...

सिंधुदुर्ग today

इमेज
कोकणच्या आजच्या लेखक कवींची लेखन भूमिका मराठी साहित्यात महत्वाची एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष प्रा. रणधीर शिंदे यांचे प्रतिपादन औरंगाबाद, पुणे, सातारा, वाई, कोल्हापूर, चिपळूण,रत्नागिरी, गोवा आदी भागातील साहित्यिकांचा सहभाग कणकवली/ऋषिकेश मोरजकर          मालवण एकेकाळी कोल्हापूर संस्थानाचा भाग होता आणि शाहू महाराजांचा वारसा या भूमीला आहे. त्यामुळे मालवण येथे समाज संवाद साहित्य संमेलन आयोजित करणे हा सामाजिक साहित्यिक औचित्याचाचं भाग आहे.कोकणच्या आजच्या लेखक कवींची लेखन भूमिका मराठी साहित्यात महत्वाची ठरत असून यात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संस्थाही समाज साहित्य प्रतिष्ठानला जोडून घेत साहित्य विषयक भरीव काम करत आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान ही महाराष्ट्राची साहित्य चळवळ व्हावी असे आग्रही प्रतिपादन मराठीतील साक्षेपी समीक्षा प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांनी केले.          बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि  समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय समाज संवाद संमेलन मालवण ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे चिरे वाहतूक ट्रक ला अपघात  देवगड निपाणी महामार्गावर साईट पट्टी नसल्याने घसरला ट्रक  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर ) कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्गावर नांदगाव तिठा येथे उपसरपंच इरफान साटविलकर यांच्या घराजवळ रात्री 10 च्या सुमारास चिरे वाहतूक करणारा ट्रक रस्त्याला साईट पट्टी नसल्याने घसरला आहे.       सुदैवाने कोणी ही जखमी झाले नाही तसेच हा रहदारी चा रस्ता व बाजूला घरांची वर्दळ मात्र त्या वेळी कोणी ही नसल्याने पुढील अनर्थ टळला आहे. जर रस्त्याला साईट पट्टी योग्य असेल तर असे अपघात होणार नाही.तरी लवकरच संबंधित विभागाने साईट पट्टी योग्य करावी अशी मागणी उपसरपंच इरफान साटविलकर यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली पंचायत समिती माजी उप सभापती लाला मेस्त्री यांचे निधन  नांदगाव प्रतिनिधी   कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत उर्फ लाला मेस्त्री यांचे आज सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. काही वर्ष ते आजारी होते.        नांदगाव पंचायत समिती मधून 1998 साली निवडणूक लढविली होती. यानंतरच्या काळात त्यांची कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती पदी नियुक्ती झाली होती .      त्यांचे  नांदगाव,वाघाची वाडीमधील राहत्या घरी आज सकाळी अकराच्या सुमारास निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे भाऊ असा मोठा परिवार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव  कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साह, शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते ओम गणेश वर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा... कणकवली (ऋषिकेश मोरजकर) भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तथा कणकवली, देवगड , वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस कणकवली येथील ओम गणेश निवासस्थाने अपूर्व उत्साह साजरा करण्यात आला.   महिला पदाधिकाऱ्यांनी प्रथम दिव्यांची ओवाळणी करून औक्षण केले.त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा झाला.  कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी  सकाळी १० वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी,हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनी आमदार नितेश राणे यांचे दिव्यांची ओवाळणी केली.त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.  त्यानंतर सर्वांशी संवाद साधत आ. नितेश राणे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्गच...

सिंधुदुर्ग today

इमेज
आमदार नितेश राणे यांचा कणकवलीत वाढदिवस होणार साजरा..!! ओम गणेश निवासस्थानी स्वीकारणार शुभेच्छा  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी कार्यकर्ते,पदाधिकारी, हितचिंतक यांच्या उपस्थितीत रविवार २३ जून रोजी सकाळी ११ वाजता केक कापून साजरा केला जाणार आहे. केक कापल्यानंतर याच ठिकाणी ते सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. गरजूंना अन्नदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,खाऊ वाटप,फळ वाटप, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात वेगवेगळे कार्यक्रम कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेले आहे.तर आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ मोठे बॅनर,फलक,जाहिराती प्रसिद्ध करून उत्साही वातावरण तयार केले आहे. दरम्यान सर्व कार्यकर्ते,पदाधिरी,हितचिंतक,विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आमदार नितेश राणे हे सकाळी ११ वाजता कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी उपस्...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव पियाळी पुलावरील अपघातात वाहतूक पोलीस हवालदार यशवंत ऊर्फ अभिजित तांबे यांचा मृत्यू  मध्यरात्री ३ वाजता झाला होता अपघात  कणकवली : प्रतिनिधी  मुंबई - गोवा महामार्गावर  नांदगाव - पियाळी पुलावर शनिवारी ( आज ) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कारचा अपघात होऊन महामार्ग केंद्र, कसाल येथे नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस हवालदार ( अभिजित ) यशवंत भास्कर तांबे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.        अभिजित तांबे हे कसाल येथून आपल्या वैभववाडी गावी जात असताना पियाळी पुलावर आल्यावर त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक ( एमएच १२ केएस १२९९ ) महामार्गावरील डिव्हायडरला आदळली. यामध्ये कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाला होता. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते अभिजित या नावे परिचित होते.  अभिजित यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अभिजित यांच्या मृत्यूची माहिती समजताच त्यांच्या मित्र परिवाराने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. याबाबत कणकवली पोलीस देखील पं...

सिंधुदुर्ग today

इमेज
'सिंधुदुर्गची नवी कविता ' काव्यसंग्रहाचे २३ रोजी रणधीर शिंदे यांच्या हस्ते मालवण येथे प्रकाशन प्रा.संजीवनी पाटील, मधुकर मातोंडकर यांचे संपादन समाज साहित्य प्रतिष्ठान चळवळीचा उपक्रम. कणकवली/ऋषिकेश मोरजकर            सिंधुदुर्गात अलीकडल्या काळात लिहू लागलेल्या कवींची गुणवत्ता चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचावी या हेतूने समाज साहित्य प्रतिष्ठान चळवळीच्या माध्यमातून 'सिंधुदुर्गची नवी कविता' हा काव्यग्रंथ संपादित करण्यात आला आहे. प्रभा प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित केला असून या ग्रंथाचे संपादन समीक्षक प्रा संजीवनी पाटील आणि कवी मधुकर मातोंडकर यांनी केले. रविवार 23 जून रोजी मालवण येथे होणाऱ्या समाज संवाद साहित्य संमेलनात प्रसिद्ध समीक्षक प्रा.रणधीर शिंदे यांच्या हस्ते आणि संमेलनाचे प्रमुख पाहुणे समीक्षक प्रा दत्ता घोलप यांच्या उपस्थितीत या संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.           समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे कोकणाबरोबरच महाराष्ट्रातील नव्याने लिहिणाऱ्या कवींची काव्य गुणवत्ता अभिजात वाचकांसमोर यावी या हेतूने विविध उपक्रम राबविले...

सिंधुदुर्ग today

इमेज
'सारेच पुरुष नसतात बदनाम:चर्चा आणि चिकित्सा' समीक्षा ग्रंथाचे २३ रोजी मालवण येथे प्रकाशन कवी अजय कांडर, समीक्षक प्रा. डॉ जिजा शिंदे यांचे संपादन कणकवली/प्रतिनिधी            कवी अजय कांडर व समीक्षक प्रा.डॉ.जिजा शिंदे (संभाजीनगर - औरंगाबाद) यांनी  'सारेच पुरुष नसतात बदनाम: चर्चा आणि चिकित्सा' हा समीक्षा ग्रंथ संपादित केला आहे. प्रभा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन मालवण येथे 23 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या समाज संवाद साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध समीक्षक रणधीर शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.           'सारेच पुरुष नसतात बदनाम' हा 19 कवयित्रींच्या कवितांचा काव्यसंग्रह दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला. या संग्रहाला महाराष्ट्रातील रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि तो बहुचर्चितही ठरला. त्यावर महाराष्ट्रातील नव्या दमाने  समीक्षालेखन करणारे अभ्यासक अंजली कुलकर्णी, प्रा. संजीवनी पाटील, प्रा. चंद्रकांत पोतदार, प्रा. जिजा शिंदे, प्रा. वैभव साटम, अंजली ढमाळ, ऋषिकेश देशमुख आणि मुक्...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग रत्नागिरी उद्योग व्यवसाय आणणार बेरोजगारी दूर करणार; खासदार नारायण राणे सी वर्ल्ड प्रकल्प, रिफायनरी येत्या काळात पूर्ण करणार  रोजगाराची साधने या जिल्ह्यात उभी करणार , पर्यटन व्यवसाय स्थिरावेल अशा सुविधा उपलब्ध करणे  समुद्री किनारपट्टीला ट्राय ट्रेन,चीपी विमानतळ वरून विमानांचे निविन रुट सुरू करणार ऋषिकेश मोरजकर (कुडाळ) सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व्यवसाय आणणार. पर्यटन वाढविणार आणि त्यासाठीचे वातावरण तयार करणार.पर्यटक इथे जास्त काळ राहतील अशी साधने निर्माण करणार. सी वर्ल्ड  प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करणार. आणि रोजगाराची साधने या जिल्ह्यात उभी करणार असा विश्वास भाजपचे नवनिर्वाचित खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला . चीपी विमानतळ वरून विमानांचे निविन रुट चालविणार. समुद्री किनारपट्टीला ट्राय ट्रेन सुरू करणार.या ट्रेन चा सर्व आराखडा तयार आहे.त्याचा खर्च कोणत्या माध्यमातून करावा यावर आपण लकरच निर्णय घेणार आहोत. असेही केंद्रीय माजी मंत्री आणि भाजपचे  खासदार नारायण यांनी सांगितले. कुडाळ येथे खासदार नाराय...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य - खा. नारायण राणे  असलदे गावाच्यावतीने नवनिर्वाचित खा. नारायण राणे यांचा सत्कार  कणकवली दि. १५ जुन ( ऋषिकेश मोरजकर)  लोकसभा निवडणूकीत माझ्या यशात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. असलदे गाव या लोकसभा निवडणूकीत माझ्या पाठीशी राहत चांगले मताधिक्य दिले. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. आपल्या कुटुंबातील माणसे या निवडणूकीत पाठीशी राहिली. त्यामुळे आगामी काळात असलदे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचा विश्वास असलदे ग्रामस्थांशी संवाद साधताना नवनिर्वाचित खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.   असलदे गावातील ग्रामस्थांच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री , नवनिर्वाचित खा. नारायण राणे निवडून आल्याबद्दल शाल व पुच्छगुच्छ देवून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.  यावेळी उपसरपंच सचिन परब , सोसायटी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे , ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा दळवी , आनंदीबाई खरात , सोसायटी संचा...

सिंधुदुर्ग today

इमेज
  स्वसंरक्षणाबरोबरच आत्मविश्वास जागृत करण्यासाठी कराटे प्रशिक्षण महत्वाचे -  दत्तात्रय मारकड  तोंडवली बोभाटेवाडीत स्वसंरक्षण व संस्कार  वर्गाचे उद्घाटन कणकवली (ऋषिकेश मोरजकर) मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि बेभरवशाच्या युगात  आत्मसंरक्षण करण्यासाठी ज्युदो -कराटे व तायक्वांडो सारखी एखादी तरी कला आत्मसात करणे गरजेची झाली असून निरोगी शरीरासाठी,स्वयं शिस्तीसाठी आणि आत्मविश्वास जागृत करण्यासाठी प्रत्येकाने मार्शल आर्टची कला आत्मसात करायलाच हवी असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो व कराटे असोसिएशनचे सचिव तथा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी तोंडवली बोभाटेवाडी येथे केले.     ते तोंडवली ग्रामस्थांच्यावतीने  बोभाटेवाडी हनुमान मंदिरमधील कराटे व संस्कार वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी  बोलत होते. तोंडवली बोभाटेवाडीतील या कराटे स्वसंरक्षण आणि संस्कार वर्गाचे उद्घाटन  सिंधुदुर्ग जिल्हा तायक्वांडो  असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी एकनाथ धनवटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.    याप्रसंगी तोंडवली गावचे पोलीस पाटील विजय...

सिंधुदुर्ग today

इमेज
समाज संवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.रणधीर शिंदे तर डॉ. दत्ता घोलप प्रमुख पाहुणे व्याख्यान, ग्रंथ प्रकाशन, काव्य पुरस्कार वितरण, खुले कविसंमेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन २३ रोजी मालवण येथे संमेलनाचे आयोजन कणकवली/प्रतिनिधी           बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे नाथ पै सेवांगण सभागृहात रविवार 23 जून रोजी एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी साक्षेपी समीक्षक प्रा.डॉ.रणधीर शिंदे (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे.तर संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत तरुण समीक्षक प्रा. डॉ.दत्ता घोलप यांना निमंत्रित करण्यात आले आहे.यावेळी संत साहित्याचे आणि साने गुरुजी जीवनचरित्राचे ज्येष्ठ अभ्यासक ऍड.देवदत्त परुळेकर व प्रसिद्ध कवी अजय कांडर यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी दिली.        संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शिंदे ...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवलीत जिलेबी वाटप शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 50 किलो जिलेबी वाटप   कणकवली प्रतिनिधी   मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र  राज्य (रजि.) यांस कडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक निमित्त कणकवलीत जिलेबी वाटप.     कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे , छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्मारकाची स्वच्छता करून ,  छत्रपती शिवाजी महाराज चौकात 50 किलो जिलेबी वाटप करून कणकवलीकरांचे तोंड गोड करण्यात आल.      या वेळी मावळे आम्ही स्वराज्याचे सिंधुदुर्ग उपजिल्हा प्रमुख अनंत आचरेकर, कणकवली तालुका प्रमुख प्रतीक भाट, माहित अधिकारी अर्जुन जाधव, सल्लागार प्रियांका नरे, खजिनदार नील आचरेकर इतर  सदस्य उपस्थित होते...

सिंधुदुर्ग today

इमेज
  नांदगाव किल्ल्यावर भगवा फडकला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अनोखी मानवंदना कणकवली प्रतिनिधी  मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य (रजि.) यांस कडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक निमित्त अनोखी मानवंदना देण्यात आली.      मुंबई गोवा हायवे  लगत    नांदगाव या गावी निसर्गाच्या कुशीत वसलेला बऱ्याच पर्यटकांना , शिवप्रेमींना दुर्लक्षित असलेला. नांदगावचा किल्ला आहे . याच किल्ल्यावर स्वच्छ्ता मोहीम करून  भगवा झेंडा फडकवण्यात आला .      या वेळी मावळे आम्ही स्वराज्याचे सिंधुदुर्ग उपजिल्हा प्रमुख अनंत आचरेकर, कणकवली तालुका प्रमुख प्रतीक भाट, माहित अधिकारी अर्जुन जाधव, सल्लागार प्रियांका नरे, खजिनदार नील आचरेकर इतर  सदस्य उपस्थित होते...

सिंधुदुर्ग today

इमेज
नवनिर्वाचित खासदार श्री. नारायणराव राणे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. सिंधुदुर्ग today (ऋषिकेश मोरजकर) रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर खासदार श्री. नारायणराव राणे यांनी आज मुंबई येथील शिवतीर्थ या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.          यावेळी त्यांचे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे आभार व्यक्त केले.याप्रसंगी शर्मिलाताई राज ठाकरे, आमदार नितेश राणे, मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते.   

सिंधुदुर्ग today

इमेज
  मालवण येथे २३ रोजी एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलन नाथ पै सेवांगण आणि समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजन संस्था पदाधिकारी मधुकर मातोंडकर, किशोर शिरोडकर यांची महिती कणकवली/प्रतिनिधी        बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे नाथ पै सेवांगण सभागृहात रविवार 23 जून रोजी एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात या संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार असून कोकणातील साहित्य रसिकांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी केले आहे.     बॅरिस्टर नाथ पै सेवांगण सतत वैचारिक उपक्रम आयोजित करत असते. हे सर्व उपक्रम सामाजिकते बरोबरच साहित्य कला संस्कृतीशी निगडित असतात. तर समाज साहित्य प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष समाज आणि साहित्य वेगळं नसतं या विचारातून काम करत आहे.या पार्श्वभूमीवर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे उद्दिष्ट एकच असल्यामुळे गे...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव सरस्वती हायस्कूलचे माजी शिस्तप्रिय मुख्याध्यापक वाय डी.देसाई यांचे निधन  नांदगाव वार्ताहर  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल नांदगाव या विद्यालयाचे शिस्तप्रिय अशी ओळख असलेले माजी मुख्याध्यापक वाय.डी.देसाई यांचे आज अल्पशा आजाराने डोंबिवली येथे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. डॉ . देसाई यांचे ते बंधू होते. त्यांच्या मुलाचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना आता रोहीनी व छाया अशा दोन मुली आहेत.        शिस्तप्रिय असलेले मुख्याध्यापक वाय.डी. देसाई अशी संपूर्ण नांदगाव दशक्रोशीत ख्याती असलेले शिक्षक कर्मचारी यांच्या तूनही त्यांचा प्रचंड दरारा होता.      १९८९ दरम्यान ते नांदगाव सरस्वती हायस्कूल मधून सेवानिवृत्त झाले होते.    त्यांच्या निधनामुळे नांदगाव सरस्वती हायस्कूल चेअरमन नागेश मोरये व शिक्षक वृंद तसेच नागरिकांनी हळहळ व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजपात प्रवेश. आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत ओम गणेश वर केला पक्षप्रवेश कणकवली : (ऋषिकेश मोरजकर ) खारेपाटण गावच्या सरपंच प्राची देवानंद इस्वलकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. प्राची इस्वलकर ह्या शिवसेना शिंदे गट पुरस्कृत खारेपाटण सरपंचपदी निवडून आल्या होत्या. खारेपाटण गावविकासासाठी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय देणे महत्वाचे आहे. आमदार नितेश राणे यांची कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गाव विकासासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचे सरपंच इस्वलकर यांनी सांगितले. ओम गणेशवर झालेल्या पक्षप्रवेशावेळी भाजपचे माजी जि. प. सभापती बाळा जठार, माजी पं स सभापती दिलीप तळेकर, माजी पं स सदस्य तृप्ती माळवदे, शक्तीकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, उपसरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, राजू वरुणकर , सुधीर कुबल, भाऊ राणे, अंजली कुबल, रफिक नाईक आदी उपस्थित होते.