सिंधुदुर्ग today



भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव 

कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साह, शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते ओम गणेश वर

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा...

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तथा कणकवली, देवगड , वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस कणकवली येथील ओम गणेश निवासस्थाने अपूर्व उत्साह साजरा करण्यात आला. 

 महिला पदाधिकाऱ्यांनी प्रथम दिव्यांची ओवाळणी करून औक्षण केले.त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा झाला. 

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी  सकाळी १० वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी,हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.



आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनी आमदार नितेश राणे यांचे दिव्यांची ओवाळणी केली.त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.

 त्यानंतर सर्वांशी संवाद साधत आ. नितेश राणे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्गच्या टोकापासून ते देवगडच्या विजयदुर्ग पर्यंत, आणि मुंबई पुण्यापासून रत्नागिरी कोल्हापूर चे  कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती लक्षणीय होती.

  आमदार नितेश राणे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करताना. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष, तथा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा उपाध्यक्ष  संदेश सावंत, संजना सावंत,तालुकाध्यक्ष संतोष कानडे,कणकवली  माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, दिलीप तळेकर, बाळा जठार,बँक संचालक विठ्ठल देसाई, सौ.प्रज्ञा ढवण, वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश परुळेकर, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, संदीप साटम, मोहन सावंत, बँक संचालक प्रकाश मोरये, सौ निता राणे, सौ.मेघा गांगण,सौ.साक्षी वाळके ,सौ.संजना सदडेकर, सौ.प्रतीक्षा सावंत, सुरेश सावंत, प्रकाश सावंत,सोनू सावंत,राजन परब, सुशील पारकर, गणेश हरणे,पंढरी वायगणकर, गुरुनाथ पेडणेकर, आबा धडा, पप्या तवटे, शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे, दामू सावंत,यांच्यासह जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत ह्या शुभेच्छा कार्यकर्ते हितचिंतक भेटून देत होते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today