सिंधुदुर्ग today
नांदगाव सरस्वती हायस्कूलचे माजी शिस्तप्रिय मुख्याध्यापक वाय डी.देसाई यांचे निधन
नांदगाव वार्ताहर
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल नांदगाव या विद्यालयाचे शिस्तप्रिय अशी ओळख असलेले माजी मुख्याध्यापक वाय.डी.देसाई यांचे आज अल्पशा आजाराने डोंबिवली येथे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. डॉ . देसाई यांचे ते बंधू होते. त्यांच्या मुलाचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना आता रोहीनी व छाया अशा दोन मुली आहेत.
शिस्तप्रिय असलेले मुख्याध्यापक वाय.डी. देसाई अशी संपूर्ण नांदगाव दशक्रोशीत ख्याती असलेले शिक्षक कर्मचारी यांच्या तूनही त्यांचा प्रचंड दरारा होता.
१९८९ दरम्यान ते नांदगाव सरस्वती हायस्कूल मधून सेवानिवृत्त झाले होते.
त्यांच्या निधनामुळे नांदगाव सरस्वती हायस्कूल चेअरमन नागेश मोरये व शिक्षक वृंद तसेच नागरिकांनी हळहळ व्यक्त केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा