सिंधुदुर्ग today



सिंधुदुर्ग रत्नागिरी उद्योग व्यवसाय आणणार बेरोजगारी दूर करणार; खासदार नारायण राणे

सी वर्ल्ड प्रकल्प, रिफायनरी येत्या काळात पूर्ण करणार 

रोजगाराची साधने या जिल्ह्यात उभी करणार , पर्यटन व्यवसाय स्थिरावेल अशा सुविधा उपलब्ध करणे 

समुद्री किनारपट्टीला ट्राय ट्रेन,चीपी विमानतळ वरून विमानांचे निविन रुट सुरू करणार

ऋषिकेश मोरजकर (कुडाळ)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व्यवसाय आणणार. पर्यटन वाढविणार आणि त्यासाठीचे वातावरण तयार करणार.पर्यटक इथे जास्त काळ राहतील अशी साधने निर्माण करणार.सी वर्ल्ड प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करणार. आणि रोजगाराची साधने या जिल्ह्यात उभी करणार असा विश्वास भाजपचे नवनिर्वाचित खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला .

चीपी विमानतळ वरून विमानांचे निविन रुट चालविणार. समुद्री किनारपट्टीला ट्राय ट्रेन सुरू करणार.या ट्रेन चा सर्व आराखडा तयार आहे.त्याचा खर्च कोणत्या माध्यमातून करावा यावर आपण लकरच निर्णय घेणार आहोत. असेही केंद्रीय माजी मंत्री आणि भाजपचे  खासदार नारायण यांनी सांगितले.

कुडाळ येथे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदाधिकारी संदीप कुडतरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, रणजित देसाई अस्मिता बांदेकर डॉक्टर मिलिंद कुलकर्णी राजू राऊळ, दादा साहिल, संजय वेंगुर्लेकर,विनायक राणे,पप्या टवते,रुपेश कानडे,राजेश पडते,निलेश परब,सुनील बांदेकर, मुक्ती परब,राकेश कांदे,विलास कुडाळकर,निलेश तेंडुलकर,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

   मतदार आणि जनतेचे ऋण वेक्त करतो.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन करतो.मोदी बद्दल गर्व वाटतो. प्रथम उमेदवारी दिली त्याबद्दल पक्षाचे नेत्यांचे आणि विजय मिळाल्या बद्दल रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार मानतो.भाजप चे सर्व नेते,भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रत्नागिरीचे आमदार आणि मंत्रीउदय सामंत, सावंतवाडीचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर, चिपळूणचे आमदार निकम, संदीप कुडतरकर यांचे त्याचप्रमाणे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे उमेदवारी मिळाली आणि विजयासाठी सहकार्य मिळाले त्यांचेही मनापासून आभार मानतो. माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी दिवसरात्र मतदारसंघात फिरले. सौ. नीलम राणे यांनी खूप मेहनत घेतली. ठिकठिकाणी बैठका घेतल्या. त्यांचा या विजयात सिंहाचा वाटा आहे. त्यांचे जे आभार मानतो. पत्रकारांचे चांगल्या बातम्या दिल्याबद्दल आभार मानतो. माजी खासदार विनायक राऊत हे माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हणाले होते स्वतःला विजय हलका झाला.मात्र त्या राऊत ना आता कळलं की की कोण हलका झाला. असो त्यांना ही दीर्घ आयुष लाभो. चांगले आरोग्य लाभो अशी शुभेच्छा देतो.निवडणूक काळात संयमी वागलो. विरोधकांनी मला उसकावण्याचा प्रयत्न राग आणण्याचा प्रयत्न मात्र मी संयमाने घेतले.त्यामुळे मला विजय मिळाला. हा विजय माझे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमातून मिळालेला असे माजी मंत्री खासदार नारायण राणे यांनी सांगितले. 

रत्नागिरी जिल्ह्यातील या कामांना खासदार नारायण राणे देणार प्राधान्यक्रम.

रत्नागिरी जिल्ह्यातून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा माझ्याकडून आहेत आणि त्यासाठी मी  विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवलेला आहे.

रत्नागिरी मध्ये महामार्ग चौपदरीकरणाचे  काम पूर्ण करणार. रत्नागिरीची पाणी टंचाई, चिपळूण ची पूरस्थिती,विमानतळ,रोजगार व पर्यटन विकास या बदल मी प्राधान्याने काम करणार. असा विश्वास रत्नागिरी सिंधुदुर्ग चे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. दोन्ही जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांनी खूप काम केले. त्यांनीच मला विजय दिला. त्याचा आणि येथील मतदारांचा मी आभारी आहे.असे त्यांनी सांगितले. कुडाळ येथे  ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today