सिंधुदुर्ग today



नांदगाव पियाळी पुलावरील अपघातात वाहतूक पोलीस हवालदार यशवंत ऊर्फ अभिजित तांबे यांचा मृत्यू 

मध्यरात्री ३ वाजता झाला होता अपघात 


कणकवली : प्रतिनिधी 

मुंबई - गोवा महामार्गावर  नांदगाव - पियाळी पुलावर शनिवारी ( आज ) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कारचा अपघात होऊन महामार्ग केंद्र, कसाल येथे नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस हवालदार ( अभिजित ) यशवंत भास्कर तांबे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

       अभिजित तांबे हे कसाल येथून आपल्या वैभववाडी गावी जात असताना पियाळी पुलावर आल्यावर त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक ( एमएच १२ केएस १२९९ ) महामार्गावरील डिव्हायडरला आदळली. यामध्ये कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाला होता. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते अभिजित या नावे परिचित होते. 

अभिजित यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अभिजित यांच्या मृत्यूची माहिती समजताच त्यांच्या मित्र परिवाराने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. याबाबत कणकवली पोलीस देखील पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today