सिंधुदुर्ग today



कोकण पदवीधर मतदानाला सुरुवात 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

                     विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३४ मतदान केंद्रावर पदवीधर मतदार शांततेत ह्क्क बजावत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १८ हजार ५५१ मतदारांची अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात मतदार संख्या वाढल्यामुळे मतदान केंद्र ३१ इतकी निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी १८२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहेत.चोख पोलीस बंदोबस्तात ही निवडणूक पार पडत असून प्रत्येक मतदान केंद्रावर महायुती व महाविकास अघाडीचे बुध आहेत.या मतदारसंघातून एकूण १३ उमेदवार रिंगणात असून त्याचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. प्रामुख्याने महायुतीचे निरंजन डावखरे विरूद्ध महाविकास अघाडीचे रमेश किर याच्यात मुख्य लढत दिसून येत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today