सिंधुदुर्ग today
नांदगाव तिठा येथे चिरे वाहतूक ट्रक ला अपघात
देवगड निपाणी महामार्गावर साईट पट्टी नसल्याने घसरला ट्रक
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर )
कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्गावर नांदगाव तिठा येथे उपसरपंच इरफान साटविलकर यांच्या घराजवळ रात्री 10 च्या सुमारास चिरे वाहतूक करणारा ट्रक रस्त्याला साईट पट्टी नसल्याने घसरला आहे.
सुदैवाने कोणी ही जखमी झाले नाही तसेच हा रहदारी चा रस्ता व बाजूला घरांची वर्दळ मात्र त्या वेळी कोणी ही नसल्याने पुढील अनर्थ टळला आहे. जर रस्त्याला साईट पट्टी योग्य असेल तर असे अपघात होणार नाही.तरी लवकरच संबंधित विभागाने साईट पट्टी योग्य करावी अशी मागणी उपसरपंच इरफान साटविलकर यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा