पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
         महाडेश्वर रेफ्रिजरेशन आमच्या येथे एअर कंडिशन करीता लागणारे गॅस,कॉम्प्रेसर, मोटर्स, इनडोअर युनिट, आउट डोअर युनिट व इतर पार्टस  मिळतील.तसेच वॉशिंग मशीन चे सर्व स्पेअर पार्ट मिळतील.     तसेच फ्रिज ,डिफ्रिज, वॉटर कुलर, वीजीकुलर करीता लागणारे सर्व साहित्य मिळेल. पत्ता:  बाबा भालचंद्र मॉल पहिला माळा एसएमएस स्कूल समोर कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मोबा. 7038766618 /9867656527

सिंधुदुर्ग today

इमेज
तोंडवली येथील आप्पा बोभाटे यांच्या गायीने  घेतला  वयाच्या 31 व्या वर्षी  अखेरचा श्वास. मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारे मालक आप्पा बोभाटे व मालकीण संगीता बोभाटे सिंधुदुर्ग today  (प्रतिनिधी) कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी ग्रामपंचायत नजिक असलेले व्यापारी आप्पा बोभाटे व त्यांच्या पत्नी सौ संगीता बोभाटे यांनी 30 वर्षांपूर्वी  आपल्या घराचे बांधकाम करत असतानाच घरातील हिंदू धर्माप्रमाणे गाईला पान देण्यात येते याचं धर्तीवर त्यांनी छोटंसं वासरू आणले. व हा हा म्हणता या वासरूला एवढा का लळा लावला की एखाद्या छोट्या बालकाला जसा लावतात त्या प्रमाणे त्या वासराचे संगोपन केले.  30 वर्षांत 14 वासरांना ही जन्म देवून घरातील सर्वांची दुधाची तहान सुध्दा भागत होती. आणि अखेर आज वृध्दपकाळाने या गाइने अखेरचा श्वास घेतला असल्याने मालक आप्पा बोभाटे व मालकीण संगीता बोभाटे यांनी दुःख अनावर झाले असून त्यांनी या गाईसाठी 4 हजार रुपये किंमतीची गादीवर बसून दफन केले आहे.यावेळी परीसरातील बहुसंख्येने शेतकरी ग्रामस्थांनी भेट देत या 33 कोटी देवता असलेल्या गाईचे अखेरचे दर्शन घेतले.    ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव सरस्वती हायस्कूल येथे महिलांसाठी विविध कार्यक्रम संपन्न पाककला स्पर्धेत आफ्रोजा नावलेकर प्रथम तर होम मिनिस्टर पैठणीची मानकरी ठरली सायली मोरये.  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पाककला ,संगीत खुर्ची , फनिगेम्स् तसेच महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाककला स्पर्धेत आफ्रोजा नावलेकर प्रथम तर होम मिनिस्टर पैठणीची मानकरी  सायली मोरये ठरली आहे.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैशाली कोरगावकर या उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्था चेअरमन नागेश मोरये, खजिनदार सुभाष बिडये, उपाध्यक्ष अंकुश डामरे, पालक संघ अध्यक्ष मारुती मोरये, मुख्याध्यापक सुधीर तांबे पाककला स्पर्धा परीक्षक आदी शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी पालक उपस्थित होते.      कार्यक्रम सुत्रसंचालन सावंत सर तर प्रास्ताविक सौ.शर्वरी सावंत यांनी केले आहे.      पाककला स्पर्धेचे परीक्षण सुप...

सिंधुदुर्ग today

इमेज
उद्या नांदगाव हायस्कूल येथे महिलांसाठी विविध स्पर्धा. नांदगाव ऋषिकेश मोरजकर  नांदगाव पंचक्रोशितील सर्व माता भगिनिंना आवाहन करण्यात येते की उद्या गुरुवार दिनांक २१/३/२०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून, सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे महिला दिन अर्थात महिला मेळावा साजरा करण्यात येणार आहे.       त्यानिमित्ताने पाककला स्पर्धा , संगीत खुर्ची व इतर फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे.        पाककला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १००१/- रु. द्वितीय क्रमांक ७०१/- रु.व तृतीय क्रमांक ५०१/- रुपये यासहीत उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील.सर्व फनी गेम्स मध्ये मिळून पहिल्या तीन महिला विजेत्यांना प्रत्येकी एक साडी देऊन गौरविण्यात येईल.          या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व. ग्रामस्थ- महिला व शाळा व्यवस्थापन यांचेमध्ये एक सौदार्हाचे संबंध निर्माण होतील ही अपेक्षा आहे.त्याचप्रमाणे मुला मुलींना एक दिवस विरंगुळादेखिल होईल यात शंका नाही.           स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन नांदगाव पंचक्रोशी माध्यामिक शिक्षण संस्...

सिंधुदुर्ग today

इमेज
  सहकाऱ्यांच्या भावनांची कदर करून सहृदयतेने काम करणारा अधिकारी म्हणजे  डॉ. तपसे डॉ. तपसे यांच्या बदली निमित त्यांना सदिच्छा देण्याच्या कार्यक्रमात सहकाऱ्यांनी केल्या आदरपूर्वक भावना व्यक्त ! नांदगाव ऋषिकेश मोरजकर  नुकतेच प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथे नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . दत्ता तपसे यांची आंतर जिल्हा बदली झाली त्या निमित्ताने त्यांचे  सर्व सहकारी यांनी डॉ. तपसे यांना सहृदयतेने शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर नांदगाव सरपंच मा. भाई मोरजकर , डॉ. देसाई मॅडम , जिल्हयातील काही वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच नांदगाव दशक्रोशीत कार्यरत सर्व उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य सहायक , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , व आशा स्वयंसेविका मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. तपसे यांच्या कार्यपद्धती बाबत , त्यांच्या सहकाऱ्यांशी वागण्या , बोलण्याच्या आदरयुक्त सुसंस्कृत पद्धतीबाबत सर्वच कर्मचारी वर्गाने भावोदगार काढले. त्यांच्या कारकिर्दीतील आपला कार्यकाळ खूप समाधानकारक पार पडल्याने सर्वांनी डॉ. तपसे सरा...

सिंधुदुर्ग today

इमेज
लोकसभा निवडणुक पार्श्वभूमीवर कणकवली पोलीसांनी दिल्या बुथ ना भेटी नांदगाव विभागात दिल्या भेटी ; बुथ सुविधा बाबत  घे तली माहिती. कणकवली ऋषिकेश मोरजकर सध्या सर्व ठिकाणी लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे उद्या शनिवार दिनांक 16 रोजी निवडणूक आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कणकवली पोलीसही सतर्क झाले असून कणकवली तालुक्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी  निवडणूक बूथ ना भेटी देत तपासणी करण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकी अनुषंगाने बूथ ची पाहणी तसेच तेथील सुविधे बाबत कणकवली चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री समशेर तडवी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली आहे .       नांदगाव असलदे कोळोशी या भागातील निवडणूक बुथ ना भेटी देऊन माहिती घेतली आहे.       यावेळी पोलिस निरीक्षक श्री. समशेर तडवी, सहा. पोलिस निरीक्षक श्री.मनोज पाटील, पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे, मेथे पोलिस, नांदगाव येथे सरपंच रविराज मोरजकर, असलदे मध्ये पोलिस पाटील सावित्री पाताडे, कोळोशी पोलिस पाटील गोरुले उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  तोंडवली बोभाटेवाडी रस्त्याचे भूमिपूजन नांदगाव प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील तोंडवली बोभाटे वाडी रस्त्याचे भूमिपूजन आज शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे. यावेळी अल्प संख्याक जिल्हा प्रमुख मज्जीद बटवाले, उप तालुका प्रमुख प्रदिप हरमलकर, ज्येष्ठ शिवसैनिक अतुल सडदेकर, युवा सेना उप तालुका प्रमुख प्रकाश (आबु) मेस्त्री, सुरेश मेस्त्री ,महम्मद साठविलकर, चंद्रकांत बोभाटे, तेजस बोभाटे, रुपेश बोभाटे ,संतोष मेस्त्री, अमोल मेस्त्री, सुप्रिया बोभाटे, साक्षी बोभाटे आणि वाडीतील सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे दिविजा वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी डॉ तपसे यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी  नांदगाव प्रतिनिधी  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज शुक्रवारी सकाळी असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांची मोफत आरोग्य तपासणी करून नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तपसे यांच्या माध्यमातून गोळ्या औषध देण्यात आले. सोबत समुदाय आरोग्य अधिकारी अमोल केंद्रे होते, वृद्धाश्रमातील सायली तांबे व कर्मचारी उपस्थित होते. वृद्धाश्रमात खूप दिवस झाले आरोग्य शिबीर घेण्यात नव्हते आले त्यामुळे रुग्णांची संख्या जास्त होती, यामध्ये 34 रुग्णांची तपासणी करण्यात आली.      आज पर्यंत त्यांनी या अगोदर ही वृध्दाश्रम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्याच प्रमाणे कणकवली पोलिस ठाण्यात ही रोजच्या धकाधकीच्या जीवनात पोलीस कर्मचारी यांच्या ही आरोग्याची तपासणी शिबिर आयोजित केले होते. डॉ तपसे यांनी असे समाज उपयोगी उपक्रम अनेक राबविले आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
  कोळोशी येथे पोषण पखवाडा साजरा. नांदगाव/वार्ताहर           ग्रामपंचायत  कोळोशी येथे पोषण पखवाडा साजरा करण्यात आला .या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .        कोळोशी अंगणवाडी केंद्र क्र. 46  च्या वतीने   पोषण अभियान अंतर्गत पोषण पखवाडा   ग्रामपंचायत कोळोशी येथे करण्यात आला .या उपक्रमांतर्गत पोषण आहाराचे महत्व कळावे म्हणून पालकांनी तयार केलेले पोषक पदार्थ प्रदर्शन मांडण्यात आले त्याद्वारे मुलांना व पालकांना पोषण आहार कसा असावा ,त्यात कोणते घटक असावेत याबाबत माहिती देण्यात     आली. या कार्यक्रमा मध्ये रंगोत्सव सेलिब्रेशन संस्था मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या मुलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .तसेच माझी कन्या भाग्यश्री  योजनेत सहभाग घेतलेल्या माता व मुलीचा सत्कार करण्यात आला .यावेळी सरपंच यांनी मुलांना व पालकांना प्रोत्साहित केले.या कार्यक्रमाला सरपंच गुरुनाथ आचरेकर,सदस्य सुचिता पोकळे,ग्रामसेवक मंगेश राणे, पोलिस ...

सिंधुदुर्ग today

इमेज
स्पृहा जोशी, सागर देशमुख यांची जोडी गाजवणार छोटा पडदा. "सुख कळले" लवकरच कलर्स मराठीवर सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर) महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना  घेऊन अवतरत आहेत. 'इंद्रायणी'नंतर आता लवकरच “सुख कळले” ही आणखी एक  नवीन मालिका कलर्स मराठी घेऊन येत आहे. नुकताच या मालिकेचा टीजर  प्रदर्शित झाला असून “ सुख कळले”च्या पहिल्याच टीजरने प्रेक्षक खूप सुखावले आहेत. याचे कारण रसिकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी पुन्हा कलर्स मराठीवर झळकणार आहे. तसंच स्पृहा बरोबर गुणी आणि चोखंदळ अभिनेता सागर देशमुख असणार आहे. सध्या तरी ही मालिका कधी सुरु होणार, हे गुलदस्त्यात असले तरी या पहिल्याच सुंदर टीजरने रसिकांना सुखद धक्का दिला असून प्रेक्षकांच्या  भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.  स्पृहा जोशी आणि सागर देशमुख हे दोन्ही तगडे कलाकार प्रथमच एकत्र येत असून ही दमदार जोडी लोकांच्या पसंतीस उतरते आहे. “सुख कळले” ही एक वास्तवदर्शी मालिका असून स्पृहा- सागर आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवायला पुन्हा  एकदा सज्ज झाले आहेत. प्रोमोमधील तरल भावस्पर्शी...

सिंधुदुर्ग today

इमेज
तोंडवली बावशी गावातील रस्त्यांचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन  नांदगाव प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी गावातील रस्त्यांचे भूमिपूजन व उद्घाटन तसेच नळ योजना भुमीपुजन आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.        यामध्ये तोंडवली इस्वलकर रस्ता वाडी 10 लाख, तोंडवली मिराशी वाडी रस्ता 10 लाख, तोंडवली नळ योजना 36,50,000 हजार ,तोंडवली सावरकर वाडी रस्ता 7 लाख तसेच पूर्ण झालेल्या बावशी बौद्ध वाडी रस्त्याचे उद्घाटन आमदार नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले आहे. यासाठी 15 लाख रुपये मंजूर झाले होते. तोंडवली नळयोजना पाठपुरावा सरपंच मनाली गुरव व माजी सरपंच उमेश कुडतरकर यांनी केला होता.      उद्घाटनप्रसंगी भाजप पदाधिकारी श्री.पंढरी वायंगणकर,श्री.संजय देसाई,श्री.रजाक बटवाले, तोंडवली सरपंच सौ.मनाली गुरव, उपसरपंच दिनेश कांडर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे, नांदगाव सरपंच श्री.भाई मोरजकर , नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर, संतोष मिराशी बुवा आदी मान्यवर,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव सोसायटी विद्यमान शिवसेना उ.बा.ठा. गटाचे संचालक अब्बास बटवाले भाजपात. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) शिवसेना उ.बा.ठा गटाचे नांदगाव सोसायटीचे संचालक अब्बास याकुब बटवाले यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला आहे .यावेळी  माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, कणकवली तालुका मंडळ अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष रज्जाक बटवाले, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर , भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका सरचिटणीस पंढरीनाथ वायंगणकर , भारतीय जनता पार्टी महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, माजी ग्रामपंचायत सदस्य गवस साठविलकर जाफर कुणकेरकर, यासीन बटवाले, दिनेश कांडर , गौस साठविलकर, यासिर मास्के, तोसिम नावलेकर, मुबारक साठविलकर ,कासम पाटणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  गावच्या विकासासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे ; ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळेच रस्त्याचे काम मार्गी - खासदार विनायक राऊत 🔰कणकवली प्रतिनिधी कोणत्याही गावच्या विकासासाठी तेथील ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे असते. वाघेरी गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी येथील ग्रामस्थ, शिवसैनिक यांचा पाठपुरावा महत्वाचा असतो. निवडणूक तेव्हाच जिंकता येते जेव्हा तुम्ही मतदारांना दिलेला शब्द पाळता..वाघेरीवाडीवर रस्ता होत आहे याचा आनंद आहे असे प्रतिपादन गांगेश्वर लोरे गावडेवाडी सोनारवाडी ते वाघेरीवाडी रस्ता भूमिपूजन सोहळ्यानिमित्त उपस्थित खासदार विनायक राऊत यांनी केले.       याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते. वाघेरी मठखुर्द सरपंच सौ.अनुजा राणे व तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संजय  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.              गांगेश्वर लोरे गावडेवाडी सोनारवाडी ते वाघेरीवाडी रस्ता तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमु...

सिंधुदुर्ग today

इमेज
  नांदगाव येथील मोरजकर ट्रस्ट च्या वतीने महिलांसाठी टाकावू पासून टिकाऊ पायपुसणी बनविणे प्रशिक्षण टाकावू पासून टिकाऊ पायपुसणी असल्याने कच्चा माल आपल्याच घरी. कुठल्याही आर्थिक पाठबळ अथवा मिशनरीची नाही गरज. कणकवली प्रतिनिधी नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव संचलित शुभांगी तंत्र प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने महिलांसाठी असे एक आगळे वेगळे अल्प दरात प्रशिक्षण घेऊन आलो आहे की, हे प्रशिक्षण घेतल्यानंतर हा व्यवसाय करण्याकरिता कुठल्याही आर्थिक पाठबळ नसतानाही घरबसल्या उद्योग करण्यासाठी सदर प्रशिक्षण टाकाऊ पासून टिकाऊ म्हणजेच आपल्या घरातील असलेल्या जुन्या साड्या अथवा जुन्या कापडापासून पायपुसणी बनविणे होय .आपण आजपर्यंत काथ्या उद्योग पासून पायपुसणी असल्याची माहिती आहे.       सदर प्रशिक्षण नांदगाव पंचक्रोशी मध्ये होण्यासाठी कमीत कमी या प्रशिक्षणात 35 ते 40 महिला असणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षणात इच्छुक असलेल्या महिलांनी आपले नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 9096564410 येथे संपर्क साधावा असे आवाहन किशोर मोरजकर ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर या...

सिंधुदुर्ग today

इमेज
वाघेरी रस्त्याचा उबाठाचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते शुभारंभ. कणकवली |प्रतिनिधी  देवगड निपाणी मार्ग ते वाघेरी गावातील वाघेरी जोडरस्ता ग्रामा. १०३, १ कि.मी.रस्ता डांबरीकरण, नूतनीकरणाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.         वाघेरी गावातून जाणारा हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला होता. अनेक वर्षे या रस्त्यासाठी ग्रामस्थांसह वाहतूकदाराची मागणी होती. फक्त निवडणूक जवळ आली की राज्यकर्ते आश्वासन देवून पुढे पाच वर्षे डोळेझाक करायचे पण यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फोंडाघाट युवा विभाग प्रमुख सिद्धेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि ग्रामपंचायत वाघेरीच्या सहकार्याने वाघेरी जोड रस्त्यासाठी बजेट अंतर्गत ३० लक्ष, पूरनिधी व खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये विकास निधीतून रस्त्यासाठी एकूण ४० लाख रुपये निधी मंजूर झाला. याबद्दल गावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.  ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव वाशिनवाडी मुख्य रस्त्याचे श्रीफळ वाढवून शुभारंभ. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून रस्ता मंजूर.  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव वाशिनवाडी मुख्य रस्त्याचे श्रीफळ वाढवून शुभारंभ आज भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.सदर रस्ता केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आला आहे. यावेळी महिला तालुकाध्यक्ष सौ. हर्षदा वाळके ,अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष रज्जाक बटवाले, तालुका सरचिटणीस श्री पंढरी वायंगणकर , नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर, कळसुली सरपंच सचिन पारधीये ,तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे , योगेश सदडेकर, बाळू मेस्त्री, देवेंद्र बोभाटे , संजय मोरये, पांडू मोरये, नंदू मोरये, किशोर मोरये, ग्रामपंचायत सदस्य नमिता मोरये, विलास कांडर, शंकर कापसे, सुहास मोरये , बावशी बुथ अध्यक्ष राणे, सौ.नादकर, भुजंग गुरव आदी वाडीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
उबाठा सेनेच्या अल्पसंख्याक पदांची करण्यात आली खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते नियुक्ती कणकवली|प्रतिनिधी   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्यांक पदाची नियुक्ती  खासदार विनायक  राऊत यांच्या हस्ते करण्यात आली.   यावेळी सतीश सावंत , संदेश पारकर , सुशांत नाईक ,कन्हैया पारकर ,नीलम पालव मॅडम, विखाळे मॅडम ,गुडेकर मॅडम ,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले ,अल्पसंख्यांक चिटणीस निसार शेख , अल्पसंख्यांक तालुका प्रमुख जावेद पाटणकर ,गवस रमदुल ,इमाम ,निसार ,याकूब यांच्या उपस्थितीत ,मालवण तालुक्यातील अल्पसंख्यांक उपतालुकाप्रमुख जहेब काझी, मालवण तालुक्यातील अल्पसंख्यांक सचिव उमर काझी,मालवण तालुक्यातील अल्पसंख्यांक जिल्हा सदस्य अजीम काझी ,मालवण तालुक्यातील अल्पसंख्यांक तालुका सहसचिव  अमेरुद्दीन काझी, वैभववाडी तालुक्यातील शाबन राऊत यांची अल्पसंख्यांक उपतालुकाप्रमुख, वैभववाडी तालुक्यातील समीर लांजेकर यांची अल्पसंख्यांक जिल्हा सहसचिव पदी , कणकवली तालुक्यातील कादर खान कणकवली उप तालुकाप्रमुख अल्पसंख्यांक,  यासीन खान अल्पसंख्यांक जिल्हा सदस्य ,अशा प्रकारे या सर्वांची नियुक्...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ओटव माईण रस्त्याच्या कामाचे श्रीफळ वाढवून शुभारंभ  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता मंजूर  जनतेतून समाधान  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नांदगाव ,ओटव ,माईन या रस्त्याचे भूमिपूजन आज  नांदगाव वाघाचीवाडी गीता भवन हॉल समोर आमदार. श्री. नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी रस्त्याच्या कामाचे श्रीफळ वाढवून शुभारंभ ओटव चे माजी सरपंच हेमंत परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.         यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर उपसरपंच इरफान साटविलकर असलदे माजी सरपंच तथा खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, हर्षदा वाळके,ओटव सरपंच रुहिता तांबे, उपसरपंच श्री ओटवकर, नांदगाव माजी सरपंच संजय पाटील, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले, बाबूराव मेस्त्री,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, संतोष जाधव, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, अक्षता खोत, ओटव ग्रामपंचायत सदस्या सौ.दिक्षा जाधव,कमलेश पाटील, मारुती मोरये, नितेश म्हसकर, मंगेश बोभाटे , अवधूत गगनग्रास,ज्ञानेश्वर मेस्त्री, र...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव आरोग्य केंद्रात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर सर्व तज्ञ डॉ उपस्थित राहणार नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक केंद्र नांदगाव सिंधू आरोग्य मेळावा 2024 या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन उद्या गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे . या आरोग्य शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ञ जनरल फिजिशियन नेत्ररोग तज्ञ सर्जरी तज्ञ बालरोग तज्ञ ,अस्थीरोग तज्ञ, दंत रोग तज्ञ, यांची उपस्थिती असणार आहे     तरी कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णांना नांदगाव प्रा .आ. केंद्रात तपासणी करिता पाठवावे जेणेकरून आपल्या रुग्णांना फायदा होईल. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ तपसे यांनी सांगितले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव भाजपच्या क्रिकेट स्पर्धेत साईल मेडिकल प्रथम तर केतकी स्पोर्ट्स व्दितीय नांदगाव प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत तोसीम नाळेकर मित्रपरिवार आयोजित दोस्ताना ग्रुप नांदगाव प्रीमियर लीगच्या भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर उपसरपंच इरफान साटविलकर, आदी उपस्थित होते. या स्पर्धेत साईल मेडिकल नांदगाव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर केतकी स्पोर्ट्स नांदगाव व्दितीय क्रमांक आणि आराधना स्पोर्ट्स नांदगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे  तर पारितोषिक वितरण समारंभ वेळी भाजपचे किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अमृत चौगुले, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, बापू फाटक, बाबू घाडीगांवकर, ऋषिकेश मोरजकर, तोसिम नावलेकर,ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, अनिकेत तांबे,जैबा नावलेकर,पप्पी सापळे, समिर नावलेकर, गवस साटविलकर, मारुती मोरये आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव परिसरात पोलिओ डोस सुरू  नांदगाव/वार्ताहर        नांदगाव परिसरात आज शून्य ते पाच वयोगटातील मुलांना पोलिओ डोस पाजण्यात आला.सकाळीच पालकांनी बालकांना डोस पाजण्यासाठी लगतच्या पोलियो डोस केंद्रांवर उपस्थितीत लावली.       ‌‌लहान बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला.आज आंगणेवाडी जत्रा असल्याने पालकांनीही सकाळी लवकर उपस्थित राहून आपल्या बालकांना पोलिओ डोस पाजून घेतला.यासाठी  आरोग्य विभागाकडून सर्व केंद्रांवर नियोजन करण्यात आले होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  बचतगटाना साहित्य विक्रीसाठी सुपर मार्केट उपलब्ध होणार ! आमदार नितेश राणे यांची ग्वाही आंगणेवाडी येथे बचतगट उत्पादित साहित्य प्रदर्शन विक्रीचे उदघाटन मसुरे | ऋषिकेश मोरजकर   आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेली १२ वर्ष बचतगट उत्पादित साहित्य विक्रीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले जाते.  जिल्हा बँकेच्या पाठींब्यातून बचतगटानी स्वतःचे हक्काचे सुपर मार्केट सुरू करावे. ते देशात पहिले केंद्र असेल.३६५ दिवस व्यवसाय केल्यास दरडोई उत्पन्न सुद्धा वाढेल. सुपर मार्केट ला जिल्हा बँक व नाबार्ड चे सहकार्य निश्चित मिळेल. काळानुसार पुढील टप्पा या प्रदर्शनाच्या विस्तारातून करायला हवा. तंत्रज्ञान बदलत असताना बचत गटांनी बदल केला पाहिजे. अतिशय चांगले पदार्थ बचतगटाच्या माध्यमातून बनवले जात आहेत.    हे प्रदर्शन आणखी विस्तारित व्हावे. मुंबई मार्केट उपलब्ध झाल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल.राणे साहेब केंद्रात आहेत त्यामुळे सतेचा वापर करून बचत गटांना सक्षम करूया! असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी आंगणेवाडी येथे केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या वतीने आंगणेवा...