सिंधुदुर्ग today
नांदगाव आरोग्य केंद्रात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर
सर्व तज्ञ डॉ उपस्थित राहणार
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक केंद्र नांदगाव सिंधू आरोग्य मेळावा 2024 या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन उद्या गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे . या आरोग्य शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ञ जनरल फिजिशियन नेत्ररोग तज्ञ सर्जरी तज्ञ बालरोग तज्ञ ,अस्थीरोग तज्ञ, दंत रोग तज्ञ, यांची उपस्थिती असणार आहे
तरी कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णांना नांदगाव प्रा .आ. केंद्रात तपासणी करिता पाठवावे जेणेकरून आपल्या रुग्णांना फायदा होईल. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ तपसे यांनी सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा