सिंधुदुर्ग today
तोंडवली बावशी गावातील रस्त्यांचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी गावातील रस्त्यांचे भूमिपूजन व उद्घाटन तसेच नळ योजना भुमीपुजन आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यामध्ये तोंडवली इस्वलकर रस्ता वाडी 10 लाख, तोंडवली मिराशी वाडी रस्ता 10 लाख, तोंडवली नळ योजना 36,50,000 हजार ,तोंडवली सावरकर वाडी रस्ता 7 लाख तसेच पूर्ण झालेल्या बावशी बौद्ध वाडी रस्त्याचे उद्घाटन आमदार नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले आहे. यासाठी 15 लाख रुपये मंजूर झाले होते.
तोंडवली नळयोजना पाठपुरावा सरपंच मनाली गुरव व माजी सरपंच उमेश कुडतरकर यांनी केला होता.
उद्घाटनप्रसंगी भाजप पदाधिकारी श्री.पंढरी वायंगणकर,श्री.संजय देसाई,श्री.रजाक बटवाले, तोंडवली सरपंच सौ.मनाली गुरव, उपसरपंच दिनेश कांडर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे, नांदगाव सरपंच श्री.भाई मोरजकर , नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर, संतोष मिराशी बुवा आदी मान्यवर,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा