सिंधुदुर्ग today
असलदे दिविजा वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी
डॉ तपसे यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी
नांदगाव प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज शुक्रवारी सकाळी असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांची मोफत आरोग्य तपासणी करून नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तपसे यांच्या माध्यमातून गोळ्या औषध देण्यात आले. सोबत समुदाय आरोग्य अधिकारी अमोल केंद्रे होते, वृद्धाश्रमातील सायली तांबे व कर्मचारी उपस्थित होते. वृद्धाश्रमात खूप दिवस झाले आरोग्य शिबीर घेण्यात नव्हते आले त्यामुळे रुग्णांची संख्या जास्त होती, यामध्ये 34 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
आज पर्यंत त्यांनी या अगोदर ही वृध्दाश्रम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्याच प्रमाणे कणकवली पोलिस ठाण्यात ही रोजच्या धकाधकीच्या जीवनात पोलीस कर्मचारी यांच्या ही आरोग्याची तपासणी शिबिर आयोजित केले होते. डॉ तपसे यांनी असे समाज उपयोगी उपक्रम अनेक राबविले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा