सिंधुदुर्ग today



नांदगाव सरस्वती हायस्कूल येथे महिलांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

पाककला स्पर्धेत आफ्रोजा नावलेकर प्रथम तर होम मिनिस्टर पैठणीची मानकरी ठरली सायली मोरये. 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पाककला ,संगीत खुर्ची , फनिगेम्स् तसेच महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाककला स्पर्धेत आफ्रोजा नावलेकर प्रथम तर होम मिनिस्टर पैठणीची मानकरी  सायली मोरये ठरली आहे.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैशाली कोरगावकर या उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्था चेअरमन नागेश मोरये,

खजिनदार सुभाष बिडये, उपाध्यक्ष अंकुश डामरे, पालक संघ अध्यक्ष मारुती मोरये, मुख्याध्यापक सुधीर तांबे पाककला स्पर्धा परीक्षक आदी शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी पालक उपस्थित होते.

     कार्यक्रम सुत्रसंचालन सावंत सर तर प्रास्ताविक सौ.शर्वरी सावंत यांनी केले आहे.

     पाककला स्पर्धेचे परीक्षण सुप्रिया मामजी, प्रीती नाईक यांनी केले. होम मिनिस्टर साठी श्री संजय सावंत सर,यांचे नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम पाहीले.तर पाककला व फनिगेम्स चे सर्व नियोजन श्रीम.नलावडे मॅडम व मोरये मॅडम यांनी केले.

पाककला स्पर्धा विजेते - प्रथम क्रमांक आफ्रोजा यासीन नावलेकर , व्दितीय वेदिका विलास फोंडके , तृतीय क्रमांक मानसी मिलिंद डगरे तर  उत्तेजनार्थ अश्विनी लक्ष्मण बिडये , अस्मिता शामसुंदर मोरये 

 होम मिनिस्टर स्पर्धा विजेते - प्रथम क्रमांक सायली शशिकांत मोरये , व्दितीय आफ्रोजा यासीन नावलेकर ,तृतीय क्रमांक अस्मिता शामसुंदर मोरये या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देउन गौरविण्यात आले आहे. सहभागी स्पर्धक यांचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today