सिंधुदुर्ग today



तोंडवली येथील आप्पा बोभाटे यांच्या गायीने घेतला वयाच्या 31 व्या वर्षी  अखेरचा श्वास.

मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारे मालक आप्पा बोभाटे व मालकीण संगीता बोभाटे

सिंधुदुर्ग today  (प्रतिनिधी)

कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी ग्रामपंचायत नजिक असलेले व्यापारी आप्पा बोभाटे व त्यांच्या पत्नी सौ संगीता बोभाटे यांनी 30 वर्षांपूर्वी  आपल्या घराचे बांधकाम करत असतानाच घरातील हिंदू धर्माप्रमाणे गाईला पान देण्यात येते याचं धर्तीवर त्यांनी छोटंसं वासरू आणले. व हा हा म्हणता

या वासरूला एवढा का लळा लावला की एखाद्या छोट्या बालकाला जसा लावतात त्या प्रमाणे त्या वासराचे संगोपन केले.  30 वर्षांत 14 वासरांना ही जन्म देवून घरातील सर्वांची दुधाची तहान सुध्दा भागत होती. आणि अखेर आज वृध्दपकाळाने या गाइने अखेरचा श्वास घेतला असल्याने मालक आप्पा बोभाटे व मालकीण संगीता बोभाटे यांनी दुःख अनावर झाले असून त्यांनी या गाईसाठी 4 हजार रुपये किंमतीची गादीवर बसून दफन केले आहे.यावेळी परीसरातील बहुसंख्येने शेतकरी ग्रामस्थांनी भेट देत या 33 कोटी देवता असलेल्या गाईचे अखेरचे दर्शन घेतले.

       याबाबत अधिक माहिती अशी की, व्यापारी आप्पा बोभाटे यांनी 30 वर्षांपूर्वी आपल्या घराचे बांधकाम करत असतानाच छोटंसं वासरूचे मुलाप्रमाणे संगोपन केले.या गाईचे नाव ही शेवंता ठेवले होते.या गाईचे मालकिन जर बाहेर गेले तर ही शेवंता गाय अन्न पाणी घेत नसे पण मालक असलेले आप्पा बोभाटे यांनी आपल्या मोबाईल वरून मालकीण त्यांची पत्नी संगीता हिला संपर्क करेल आणि गायीच्या जवळ मोबाईल धरत मालकीण मालकिणीचा शब्द कानी पडतात ती अन्न पाणी खात असे. असा माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांवरही प्रचंड असा लळा लागला होता.गेल्या वर्षी या गाईला शेप्टी रोग ही झाला होता.यावेळी मालक आप्पा बोभाटे यांनी या गाईंच्या उपचारासाठी हजारो रुपये खर्च केले होते.नांदगाव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ झमणे मॅडम यांनी या गाईवर योग्य उपचार केले होते.व यातून ती बरी झाली होती.  या आठ दिवसांत वृध्दापकाळाने पुन्हा आजारी पडल्याने तीची सेवा करण्यासाठी 4 हजार किमतीची गादी विकत घेऊन त्या गादीवर गाईचे संगोपन केले जात होते. या गाईला अंघोळ घातली जात होती.

       अशा या 33 कोटी देवता असलेल्या गाईने आज  अखेरचा श्वास घेतला असल्याने मालक आप्पा बोभाटे यांनी मालकीण संगीता बोभाटे यांनी त्या गाईला साडी परिधान करून तीची पुजा करीत गादीवर बसून दफन करण्यात आले आहे. यावेळी तोंडवली परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी भेट देऊन गाईचे दर्शन घेतले आहे.या गाईच्या जाण्याने आप्पा बोभाटे व सौ. संगीता बोभाटे व कुटुंबीय यांना दुःख अनावर झाले आहे.

मुक्या गाईवर प्रेम करणारे बोभाटे कुटुंबिय 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today