सिंधुदुर्ग today

उद्या नांदगाव हायस्कूल येथे महिलांसाठी विविध स्पर्धा.

नांदगाव ऋषिकेश मोरजकर 

नांदगाव पंचक्रोशितील सर्व माता भगिनिंना आवाहन करण्यात येते की उद्या गुरुवार दिनांक २१/३/२०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून, सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे महिला दिन अर्थात महिला मेळावा साजरा करण्यात येणार आहे.

      त्यानिमित्ताने पाककला स्पर्धा , संगीत खुर्ची व इतर फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे.

       पाककला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १००१/- रु. द्वितीय क्रमांक ७०१/- रु.व तृतीय क्रमांक ५०१/- रुपये यासहीत उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील.सर्व फनी गेम्स मध्ये मिळून पहिल्या तीन महिला विजेत्यांना प्रत्येकी एक साडी देऊन गौरविण्यात येईल.

         या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व. ग्रामस्थ- महिला व शाळा व्यवस्थापन यांचेमध्ये एक सौदार्हाचे संबंध निर्माण होतील ही अपेक्षा आहे.त्याचप्रमाणे मुला मुलींना एक दिवस विरंगुळादेखिल होईल यात शंका नाही.

          स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन नांदगाव पंचक्रोशी माध्यामिक शिक्षण संस्थेच्या चे अध्यक्ष श्री.नागेश मोरये तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक - शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांचेमार्फत करण्यात येत आहे.

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today