सिंधुदुर्ग today
नांदगाव ओटव माईण रस्त्याच्या कामाचे श्रीफळ वाढवून शुभारंभ
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता मंजूर
जनतेतून समाधान
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नांदगाव ,ओटव ,माईन या रस्त्याचे भूमिपूजन आज नांदगाव वाघाचीवाडी गीता भवन हॉल समोर आमदार. श्री. नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी रस्त्याच्या कामाचे श्रीफळ वाढवून शुभारंभ ओटव चे माजी सरपंच हेमंत परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर उपसरपंच इरफान साटविलकर असलदे माजी सरपंच तथा खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, हर्षदा वाळके,ओटव सरपंच रुहिता तांबे, उपसरपंच श्री ओटवकर, नांदगाव माजी सरपंच संजय पाटील, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले, बाबूराव मेस्त्री,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, संतोष जाधव, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, अक्षता खोत, ओटव ग्रामपंचायत सदस्या सौ.दिक्षा जाधव,कमलेश पाटील, मारुती मोरये, नितेश म्हसकर, मंगेश बोभाटे , अवधूत गगनग्रास,ज्ञानेश्वर मेस्त्री, राजेश तांबे,महेश गावकर, आदी नांदगाव ओटव माईन मधील भाजपचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी उपस्थित होते.
नांदगाव ओटव माईण रस्ता हा तिनं किलोमीटर अंतरावरील भाग बराच जागोजागी खड्डे पडून ना दुरुस्त झाला होता. आज शुभारंभ होत असल्याने या ठिकाणच्या जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा