सिंधुदुर्ग today



लोकसभा निवडणुक पार्श्वभूमीवर कणकवली पोलीसांनी दिल्या बुथ ना भेटी

नांदगाव विभागात दिल्या भेटी ; बुथ सुविधा बाबत घेतली माहिती.

कणकवली ऋषिकेश मोरजकर

सध्या सर्व ठिकाणी लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे उद्या शनिवार दिनांक 16 रोजी निवडणूक आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कणकवली पोलीसही सतर्क झाले असून कणकवली तालुक्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी  निवडणूक बूथ ना भेटी देत तपासणी करण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकी अनुषंगाने बूथ ची पाहणी तसेच तेथील सुविधे बाबत कणकवली चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री समशेर तडवी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली आहे .

      नांदगाव असलदे कोळोशी या भागातील निवडणूक बुथ ना भेटी देऊन माहिती घेतली आहे.

      यावेळी पोलिस निरीक्षक श्री. समशेर तडवी, सहा. पोलिस निरीक्षक श्री.मनोज पाटील, पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे, मेथे पोलिस, नांदगाव येथे सरपंच रविराज मोरजकर, असलदे मध्ये पोलिस पाटील सावित्री पाताडे, कोळोशी पोलिस पाटील गोरुले उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today