सिंधुदुर्ग today



नांदगाव भाजपच्या क्रिकेट स्पर्धेत साईल मेडिकल प्रथम

तर केतकी स्पोर्ट्स व्दितीय

नांदगाव प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी पुरस्कृत तोसीम नाळेकर मित्रपरिवार आयोजित दोस्ताना ग्रुप नांदगाव प्रीमियर लीगच्या भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर उपसरपंच इरफान साटविलकर, आदी उपस्थित होते. या स्पर्धेत साईल मेडिकल नांदगाव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर केतकी स्पोर्ट्स नांदगाव व्दितीय क्रमांक आणि आराधना स्पोर्ट्स नांदगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे 

तर पारितोषिक वितरण समारंभ वेळी भाजपचे किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अमृत चौगुले, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, बापू फाटक, बाबू घाडीगांवकर, ऋषिकेश मोरजकर, तोसिम नावलेकर,ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, अनिकेत तांबे,जैबा नावलेकर,पप्पी सापळे, समिर नावलेकर, गवस साटविलकर, मारुती मोरये आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today