सिंधुदुर्ग today

 


कोळोशी येथे पोषण पखवाडा साजरा.

नांदगाव/वार्ताहर 

         ग्रामपंचायत  कोळोशी येथे पोषण पखवाडा साजरा करण्यात आला .या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .

       कोळोशी अंगणवाडी केंद्र क्र. 46  च्या वतीने   पोषण अभियान अंतर्गत पोषण पखवाडा   ग्रामपंचायत कोळोशी येथे करण्यात आला .या उपक्रमांतर्गत पोषण आहाराचे महत्व कळावे म्हणून पालकांनी तयार केलेले पोषक पदार्थ प्रदर्शन मांडण्यात आले त्याद्वारे मुलांना व पालकांना पोषण आहार कसा असावा ,त्यात कोणते घटक असावेत याबाबत माहिती देण्यात     आली. या कार्यक्रमा मध्ये रंगोत्सव सेलिब्रेशन संस्था मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या मुलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .तसेच माझी कन्या भाग्यश्री  योजनेत सहभाग घेतलेल्या माता व मुलीचा सत्कार करण्यात आला .यावेळी सरपंच यांनी मुलांना व पालकांना प्रोत्साहित केले.या कार्यक्रमाला सरपंच गुरुनाथ आचरेकर,सदस्य सुचिता पोकळे,ग्रामसेवक मंगेश राणे, पोलिस पाटील संजय गोरुले,पोस्टमास्तर वृषाली कुंभार,आशा स्वयंसेविका माया इंदप, सीआरपी  साक्षी चव्हाण, कणकवली तालुका पत्रकार संघाचे सहसचिव उत्तम सावंत ,प्रकाश मीठबावकर,बाबू पडवळ,तसेच  वैशाली इंदप,सानिका  इंदप ,रुही इंदप,पुर्वा तांबे,मनोज तांबे, छाया इंदप,आरती खरात , प्राप्ती तांबे आदींसह पालकवर्ग  उपस्थित होता.

या  कार्यकमाचे  सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सान्वी चव्हाण यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदतनीस ज्योत्स्ना राणे, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष तावडे यांनी परिश्रम घेतले.

ग्रामपंचायत कोळोशी येथे पोषण पखवडा उपक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानित करून गौरविताना मान्यवर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today