सिंधुदुर्ग today

 


सहकाऱ्यांच्या भावनांची कदर करून सहृदयतेने काम करणारा अधिकारी म्हणजे  डॉ. तपसे

डॉ. तपसे यांच्या बदली निमित त्यांना सदिच्छा देण्याच्या कार्यक्रमात सहकाऱ्यांनी केल्या आदरपूर्वक भावना व्यक्त !

नांदगाव ऋषिकेश मोरजकर 

नुकतेच प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथे नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . दत्ता तपसे यांची आंतर जिल्हा बदली झाली त्या निमित्ताने त्यांचे  सर्व सहकारी यांनी डॉ. तपसे यांना सहृदयतेने शुभेच्छा दिल्या .

या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर नांदगाव सरपंच मा. भाई मोरजकर , डॉ. देसाई मॅडम , जिल्हयातील काही वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच नांदगाव दशक्रोशीत कार्यरत सर्व उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य सहायक , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , व आशा स्वयंसेविका मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी डॉ. तपसे यांच्या कार्यपद्धती बाबत , त्यांच्या सहकाऱ्यांशी वागण्या , बोलण्याच्या आदरयुक्त सुसंस्कृत पद्धतीबाबत सर्वच कर्मचारी वर्गाने भावोदगार काढले.

त्यांच्या कारकिर्दीतील आपला कार्यकाळ खूप समाधानकारक पार पडल्याने सर्वांनी डॉ. तपसे सरांविषयी आदरयुक्त मनोकामना व्यक्त करून सरांना भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या . असे अधिकारी मिळणे हे आपले भाग्य असून डॉ. तपसे यांनी पुन्हा या जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्स्क, किंवा राज्याचे संचालक म्हणून यावे . अशा मनोकामना व्यक्त केल्या.

काही कर्मचारी व्यक्त होताना भावूक झाले हेच सरांचे यश आहे.

या प्रसंगी श्री. जाधव सर केंद्रप्रमुख यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या . आजही काही कर्मचारी बदली रद्द करा म्हणून विनवणी करत आहेत, डोळ्यात पाणी आणून सरांना विनवणी करत आहेत, पण डॉ साहेबांनी परत पुन्हा येईल हा शब्द दिला आहे त्यांना,मा. सरपंच यांनीही आपल्या मनोगतात असे डॉक्टर पुन्हा मिळणे कठीण . अशा आदरभावना मांडल्या .

सत्काराला उत्तर देताना - डॉ. तपसे यांनी प्रेमाने जग जिंकता येते.

मी माझे कर्तव्य तत्परतेने व प्रामाणिक पणे पार पाडले ' आपण सर्वांनी मला उत्तम सहकार्य केले . अशा शब्दांत सहकाऱ्यांप्रती आदरयुक्त ऋण व्यक्त केले .

यासाठीही मनाचा मोठेपणा असावा लागतो तो तपसे सरांकडे असल्याचे दिसून आले . 

या कार्यक्रमासाठी मा.सरपंच भाई मोरजकर,वै.अधिकारी देसाई मॅडम, विस्तार अधिकारी ठाणेकर, उपजिल्हा रुग्णालय आरोग्य सहायक श्री प्रशांत बुचडे, वरवडे आरोग्य सहायक परब, आरोग्य सेवक जाधव, निवृत्त आरोग्य सहायिका देवधर सिस्टर, शिरगांव आरोग्य सहायक रणसींग साहेब, नांदगाव आरोग्य सहाय्यक कांबळे, राठोड, आरोग्य सहायिका साटम सिस्टर, घाडी सिस्टर, फार्मासिस्ट संदीप साटम, मुख्यालय अधीपरिचारिका पवार सिस्टर, समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्विनी पारकर, कदम मॅडम व रासम मॅडम, गटप्रवर्तक सोनाली शेलार व सर्व आशा, आरोग्य सेवक चव्हाण साहेब,धुमाळे साहेब, स्टाफ नम्रता मुसळे, पर्णवी तांबे, माईणकर सिस्टर, ठाकर सिस्टर, गोसावी सिस्टर,गंगावणे सिस्टर व इतर मंडळी उपस्थित होते.

सूत्र संचालक मा. श्री कांबळे साहेब .यांनी केले तर आभार श्री .धुमाळे साहेब यांनी मानून कार्यक्रमाची गोड सांगता झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today