सिंधुदुर्ग today

 


गावच्या विकासासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे ; ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळेच रस्त्याचे काम मार्गी - खासदार विनायक राऊत

🔰कणकवली प्रतिनिधी

कोणत्याही गावच्या विकासासाठी तेथील ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे असते. वाघेरी गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी येथील ग्रामस्थ, शिवसैनिक यांचा पाठपुरावा महत्वाचा असतो. निवडणूक तेव्हाच जिंकता येते जेव्हा तुम्ही मतदारांना दिलेला शब्द पाळता..वाघेरीवाडीवर रस्ता होत आहे याचा आनंद आहे असे प्रतिपादन गांगेश्वर लोरे गावडेवाडी सोनारवाडी ते वाघेरीवाडी रस्ता भूमिपूजन सोहळ्यानिमित्त उपस्थित खासदार विनायक राऊत यांनी केले.
      याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते. वाघेरी मठखुर्द सरपंच सौ.अनुजा राणे व तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संजय  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
             गांगेश्वर लोरे गावडेवाडी सोनारवाडी ते वाघेरीवाडी रस्ता तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट करून १ कोटी ४६ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या रस्त्याबरोबरच वाघेरी ते वाघेरीवाडी रस्ता अनेक वर्षे प्रलंबित होता. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवर या वाडीतील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. आता या रस्त्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार १८ लाख निधी मंजूर झाला आहे. उर्वरीत रस्ता लवकरच पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करु यासाठी तसेच प्रत्येक विकास कामांसाठी वाडीतील ग्रामस्थांनी नेहमी संपर्कात रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने खासदार साहेबांचे आभार मानण्यात आले.
  या भूमिपूजन कार्यक्रमासाठी शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू रावराणे, विभागप्रमुख सिद्धेश राणे, माजी सरपंच तुकाराम गुरव, शाखाप्रमुख दत्तात्रय राणे, महिला शाखा संघटक सावली पन्हाळकर, बापू कदम, एकनाथ राणे, किर्तीकुमार पाटील, निलेश चव्हाण, संजय कदम, चंद्रकांत कदम, संतोष पन्हाळकर, राजाराम उपासकर, गौरव पन्हाळकर, राजाराम कदम, विलास लाड, पंढरी राणे, सुहास ठुकरुल, ओम राणे, ओंकार तावडे आदी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today