सिंधुदुर्ग today



‘जाधव गुरुजींच्या संघर्षाची जीवनगाथा तरुण पिढीसाठी दिशादर्शक’ : संदेश उर्फ गोट्या सावंत

कणकवलीत संतोष जाधव  ‘संघर्षातून घडलेले आयुष्य’ पुस्तकाचे प्रकाशन.

कणकवली: (ऋषिकेश मोरजकर) 

 "संतोष जाधव यांनी आयुष्यभर निरपेक्ष भावनेने शिक्षकी पेशा आणि समाजकारण जपले. संघर्षाचे अनेक उन्हाळे-पावसाळे अंगावर झेलत त्यांनी उभे केलेले आयुष्य प्रत्येकाला उमेद देणारे आहे. जाधव गुरुजींच्या संघर्षाची ही प्रेरणादायी जीवनगाथा आजच्या तरुण पिढीने वाचून जगण्याचे बळ घेतले पाहिजे," असे  प्रतिपादन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले.

          युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित माजी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संतोष जाधव यांच्या ‘संघर्षातून घडलेले आयुष्य’ या ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा नुकताच कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल (HPCL) सभागृहात थाटात संपन्न झाला. या वेळी पुस्तकाचे प्रकाशन संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके,नांदगाव सरपंच भाई मोरजकर, पंढरी वायंगणकर, आनंद कासर्डेकर व मान्यवर उपस्थित होते.

          कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना  संदेश सावंत पुढे म्हणाले की, "जाधव सरांनी सेवेत असताना पदाची कोणतीही झूल न पांघरता केवळ माणसांची श्रीमंती कमावली. संकटसमयी पाठीशी उभी राहणारी हक्काची माणसं हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे. त्यांनी आपल्या अनुभवांचे संचित या पुस्तकाच्या रूपाने समाजासमोर मांडले असून, त्यातून संघर्षावर मात करण्याची नवी दृष्टी तरुणांना मिळेल."

          या सोहळ्यास कणकवलीच्या सभापती हर्षदा वाळके, युवा संदेश प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वर्ग, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच जाधव सरांचे आप्तेष्ट व स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभापती हर्षदा वाळके यांनीही जाधव सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कर्तृत्वाचा गौरव करत पुस्तकाला व त्यांच्या पुढील साहित्यप्रवासाला शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today