सिंधुदुर्ग today
वैश्य वाणी बांधवांच्या हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा कासार्डे येथे नागरी सत्कार
वैश्यवाणी समाजाला ओबीसी प्रमाणपत्राचा मार्ग सुकर झाल्याबद्दल कृतज्ञता; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग.
आम्ही या प्रवासाचे सह प्रवासी होतो - आमदार प्रमोद जठार
कासार्डे : (ऋषिकेश मोरजकर)
वैश्यवाणी समाजातील पात्र घटकांना ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार प्रमोद जठार यांचा ओबीसी बांधवांच्या वतीने कासार्डे येथे नागरी सत्कार करण्यात आला. वैश्यवाणी समाजातील काही विशेष घटकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्याच पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न सभागृहात मांडला होता. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळत महायुती सरकारच्या माध्यमातून संबंधित अडचणी दूर करण्यासाठी परिपत्रक काढण्यात आल्याने समाजातील पात्र नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर अभिषेक मंगल कार्यालय, कासार्डे येथे ओबीसी बांधवांच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा कृतज्ञतापूर्वक नागरी सत्कार करण्यात आला. तसेच हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या समाजघटकांबाबत सकारात्मक भूमिका घेत राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्याबद्दलही यावेळी महायुती सरकारचे आभार मानण्यात आले. या निर्णयामुळे पात्र वैश्यवाणी समाजबांधवांना ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी समाजाच्या प्रश्नासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल समाजबांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले. समाजाच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवून शासनदरबारी पाठपुरावा करण्याची भूमिका यापुढेही कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मी तुम्हाला समाजाला न्याय मिळावा म्हणून आलोय. या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मदत केली यात मग तात्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तर खूप मदत केली. या प्रवासाचे आम्ही सह प्रवासी होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राव राणे या सगळ्यांनी मिळून मदत केली असल्याचे ही आमदार प्रमोद जठार यांनी बोलताना सांगितले आहे.
कार्यक्रमाला बुवा संतोष कानडे, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, बाळा जठार, प्राची ईसवलकर, सुधीर नकाशे, सुनील खाडये, श्री.चंद्रकांत उर्फ राजू जठार, नेहा माईणकर, सौ. श्री. विकास पाडगांवकर, सुनील वामणे, महेंद्र सावंत, श्री. बाजीराव घोरपडे, श्री. रमेश प्रभाकर जामचे, श्री. सुरेश पाटणकर, श्रीकृष्ण कोकाटे, श्री. विलास पाटणकर, श्री. संतोष माळिणकर, श्री. उदय सावंत, श्री. नितीन निळकंठ , श्री. माणिकराव सराफ, श्री. प्रमोद पाटणकर, श्री. ओंकार साठे, श्री. अनिल घाडी, श्री. संजय घाडी, श्री. प्रदीप नाईक यांच्यासह कासार्डे सरपंच निशा नकाशे, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, शिडवणे सरपंच रवि शेटये आदी समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन श्री. संजय नकाशे व श्री. दिगंबर ऊर्फ बंड्या मांजरेकर यांच्या वतीने करण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा