सिंधुदुर्ग today



सांगली येथून चोरीला गेलेली दुचाकी नांदगाव येथे सापडली.

नांदगाव येथील दुचाकी घेऊन अज्ञात चोरट्याने केले पलायन .

दोन्ही एकाच वेळीच्या घटनेने उडाली खळबळ.

नांदगाव /प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथून शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री ९ च्या सुमारास नांदगाव तिठा फोंडा रस्ता लगत पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेली असल्याची फिर्याद नांदगाव खालची मुस्लिम वाडी येथील समीर खुदबुद्दीन नावलेकर यांनी कणकवली पोलिसात दिली आहे.

      याच दरम्यान याच रस्त्यालगत एक काळ्या रंगाची दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली असल्याची माहिती नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कासार्डे बिट चे चंद्रकांत झोरे यांना माहिती दिली. मात्र या दुचाकीला दोन्ही बाजूला असलेल्या नंबर प्लेट काढून टाकण्यात आल्याने सदर दुचाकी बाबत संशय बळावला. कासार्डे बिट चे श्री.चंद्रकांत झोरे तसेच श्री जाधव यांनी नांदगाव येथे येत चेस नंबर वरुन मालकाचा शोध घेतला असता. सदर दुचाकी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील असून या पोलीस ठाण्यात सदर मालकाने आपली दुचाकी चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल केलेली असल्याचे सांगितले आहे. 

    नांदगाव येथील समिर नावलेकर यांची ही नांदगाव येथून दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने त्यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक २५ रोजी रात्री ९ च्या सुमारास नांदगाव तिठा येथे माझ्या मालकीची काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेडंर एम एच ०७ ए.ए. ४१३९ ने आलो होतो. तेथे नमाज पठण करुन रात्री ९.४५ वा. आलो असता मी ज्या ठिकाणी दुचाकी पार्क केली होती त्या ठिकाणी दुचाकी आढळून आली नाही. बराच वेळ शोधाशोध केली मात्र ती आढळून आली नाही.अशी तक्रार समिर खुदबुद्दीन नावलेकर याने दाखल केली  आहे. 

      दरम्यान या दोन्ही घटना एकाच दिवशी व एकाच रस्त्यालगत पाहता या बेवारस स्थितीत आढळून आलेल्या दुचाकी आणि पार्किंगला उभी असलेली दुचाकी त्याच दरम्यान गायब होणे यामुळे ज्या चोरट्याने सदर दुचाकी टाकून नांदगाव येथील दुसरी दुचाकी घेऊन गेला असेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या घटनेमुळे नांदगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today