सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे सलग चौथ्या वर्षी रक्तदान शिबिर झाले संपन्न
सर्पमित्र इंडिया सिंधुदुर्ग व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तर्फे केले होते आयोजन.
नांदगाव (प्रतिनिधी)
सर्पमित्र इंडिया सिंधुदुर्ग व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले.
हे सलग चौथे वर्ष रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत आहे. यामुळे उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या या महान कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच रक्त दान हे श्रेष्ठ दान आहे. जेव्हा रक्ताची गरज भासते तेव्हा आपल्याला रक्तदानाचे महत्त्व कळते. तसेच सर्प मित्र म्हणून समाजात चांगले काम करत असल्याने त्यासाठी ही शुभेच्छा देण्यात आल्या.
सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 21 रक्त दात्यांनी रक्त दान केले.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये, तिवरे माजी सरपंच वाळवे, जन आरोग्य समिती सदस्य ऋषिकेश मोरजकर, वैद्यकीय अधिकारी डॉ देसाई, आरोग्य सहाय्यक दिपक कांबळे, आरोग्य सहाय्यीका श्रीमती पवार, दिविजा वृध्दाश्रम सचिव तसेच श्री शेटये, सर्प मित्र संपूर्ण टिम , सिंधुदुर्ग रक्त प्रतिष्ठान पदाधिकारी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा