सिंधुदुर्ग today
पालकमंत्री नितेश राणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ; भात नुकसानीची केली पाहणी.
शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतली कैफियत; शेतकऱ्यांना सर्वांगीण मदतीचा दिला विश्वास.
पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून मळगाव, होडावडा येथील विहीर,नदी ची पाण्याची पातळीची केली पाहणी.
स्थानिक शेतकऱ्यांशी साधला संवाद, सर्वांगीण मदतीचा दिला विश्वास.
भाताचा "अवा" अपेक्षित वाढला नाही,फुटवे आले नाहीत,पसवलेल्या भातात दाणा नाही.
पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना पालकमंत्री राणे यांचे निर्देश.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.याची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सावंतवाडी मळगाव येथून पाहणी दौरा सुरू केला. मळगाव येथे भात शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना विश्वास दिला, शासन तुमच्यासोबत आहे याची हमी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत आणि तुमच्या नुकसानीचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळेल. ट्रिगर १ च्या माध्यमातून दुष्काळ परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचेही पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आणि नदीच्या पातळीची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनालाही यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, लघू पाटबंधारेचे संतोष शिरोडकर, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अधिकारी सुदेश राणे, व इतर अधिकारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्त व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाऊस कमी पडल्याने शेती अपेक्षित पावली नाही हे यावेळी शेतामध्ये दिसून आले. पाऊस खंडित झाल्याने अनेक ठिकाणी भाताला फुटवे आले नाहीत.त्यामुळे भाताचा "अवा" अपेक्षित वाढला नाही. त्याला फुटवे नाही आले. आणि आता पसवने शक्यता कमी झाली आहे. ज्या भाताची पालकमंत्री नितेश राणे यांनी पाहणी केली त्यात पसवलेले भात सुद्धा दाणा देण्यास योग्य नाही. हे पाहणीत आले.
पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यात भात पिकावर गंभीर परिणाम झाला असून काही भागात भात पीक करपले आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी दुष्काळाची प्रथम स्थिती अर्थात ‘ट्रिगर-१’ जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रिगर-१ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या सवलती शेतकऱ्यांना प्राधान्याने आणि तातडीने मिळाव्यात, तसेच पीक नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा