सिंधुदुर्ग today



नांदगाव ग्रामपंचायत येथे श्री गणेश चतुर्थी पाश्र्वभूमीवर ट्रॅफिक संदर्भात बैठक 

गणेश उत्सव काळात नांदगाव बाजारात वाहने पार्किंग करण्यास बंदी. 

नांदगाव/ऋषिकेश मोरजकर 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे श्री गणेश चतुर्थी पाश्र्वभूमीवर नांदगाव बाजारात ट्रॅफिक ची मोठी समस्या निर्माण होते. यासाठी आज नांदगाव ग्रामपंचायत मार्फत सरपंच रविराज मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली रिक्षा संघटना, व्यापारी संघटना, मॅजिक संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

      यावेळी उपसरपंच इरफान साटविलकर, रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी किशोर मोरये, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी पप्पी वायंगणकर,मॅजिक संघटना प्रतिनिधी अल्लाउद्दीन बोबडे तसेच इतर सभासद उपस्थित होते.

       श्री गणेश चतुर्थी पाश्र्वभूमीवर ट्रॅफिक संदर्भात घ्यावयाची काळजी, त्याचप्रमाणे स्वच्छता संदर्भात चर्चा करण्यात आली.

     ट्रॅफिक साठी गणेश उत्सव काळात नांदगाव बाजारात कुठल्याही वाहनांना पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बाजार खरेदी करण्या अगोदर आपली वाहने अथवा दुचाकी ब्रिज खाली किंवा सर्व्हिस रोड लगत इतर वाहनांना त्रास न करता पार्किंग करावी, नांदगाव तिठा फोंडा रोड सुरू होतो त्या पासून ते मशिद रोड हद्दीपर्यंत दोन्ही साईडने खडी टाकून तातडीने रुंदी वाढविणे, गणेश उत्सव काळात फोंडाघाट रोड वरुन अवजड वाहतूक,तसेच चिरे होत असते ती अवजड वाहतूक या काळात बंद ठेवण्यात यावी असा ठराव घेण्यात आला व तसा ठराव कणकवली पोलीस निरीक्षक यांना देण्याचे ठरविण्यात आले. भाजी मार्केट हे उड्डाणपुलाखालील रिकाम्या जागेत घेण्यात यावे, मच्छीमार्केट सार्वजनिक शौचालयाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत बसविण्यात यावे असे ठरले. सर्व संघटनांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करावे आणि आपल्या गावात गणेशोत्सव काळात सलोख्याचे वातावरण राहील याची खबरदारी घ्यावी असे आवाहन नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी उपस्थितांना केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today