पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव दशक्रोशी सकल हिंदू समाजाच्या वतीने अयोध्या श्री राम मंदिर व्दितीय वर्धापन आज होणार साजरा  आज नांदगाव दशक्रोशीत घुमणार "जय श्रीराम" चा गजर नांदगाव येथे भव्य मोटर सायकल रॅली  कणकवली : (ऋषिकेश मोरजकर) सकल हिंदू समाज नांदगाव दशक्रोशी च्या वतीने अयोध्या श्री राम मंदिर व्दितीय वर्धापन दिनानिमित्त यावर्षी आज गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६  रोजी संपूर्ण देशभर उत्साहात साजरा होणार  आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यंदाही नांदगाव दशक्रोशीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून आज नांदगाव दशक्रोशीत जय श्री राम चा गजर घुमणार आहे.नांदगाव तिठा येथून श्री रामाच्या मुर्तीची पुजा विधी  आज गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६  रोजी सकाळी ९ वा.तर  लगेचच सकाळी ९.३० वा. रॅलीला सुरुवात होणार आहे. नांदगाव तिठा ते नांदगाव मोरयेवाडी श्रीराम मंदिर येथे आरती तेथून नांदगाव गोसावी कुंभारवाडी श्री राम मंदिर येथे आरती तसेच येथून ओटव ,आयनल ,कोळोशी असलदे मार्गे नांदगाव तिठा ते तोंडवली बोभाटेवाडी श्री हनुमान मंदिर व तिथे आरती व पुन्हा नांदगाव तिठा येथे आ...

सिंधुदुर्ग today

इमेज
  आजच्या कवयित्रींचे काव्य लेखन आश्वासक - डॉ.आ.ह. साळुंखे. प्रभा प्रकाशन कणकवली प्रकाशित कवयित्री मनीषा शिरटावले लिखित   'विसंवादाशी संवाद' काव्यसंग्रहाचे प्रकाशन. कणकवली/प्रतिनिधी     आजच्या कवयित्रींचे काव्यलेखन आश्वासक असून आपल्या आजुबाजूच्या मुली साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होणे, हे आम्हा मावळत्या पिढीसाठी अभिमानाची आणि समाधान देणारी गोष्ट आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह.साळुंखे यांनी केले.  कवयित्री मनीषा शिरटावले यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीने प्रकाशित केलेल्या विसंवादाशी संवाद या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ.साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.       सातारा येथे भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला लोकायत प्रकाशन, यशवंतनगर सातारा येथे आयोजित केलेल्या विसंवादाशी संवाद या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. यशवंत पाटणे, ज्येष्ठ पत्रकार हरीश पाटणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने, व्याख्याते प्रदीप कांबळे, इतिहास संशोधक डॉ. राजेंद्र घाडगे, सुप्रसिद्ध लेखक प्रल्हाद पार्टे आदी मान्यवर ...

सिंधुदुर्ग today

इमेज
प्रा.हरिभाऊ भिसे यांची गोंधळ जागरणच्या माध्यमातून लोककलेचा वारसा जपण्याचं आणि समाज प्रबोधनाचे काम  कौतुकास्पद– भगवान लोके  असलदेत भगवान लोके मित्रमंडळाच्यावतीने गोंधळी कलावंत प्रा. हरिभाऊ भिसे यांचा सत्कार  कणकवली : प्रतिनिधी  भवानी मातेच्या गोंधळामध्ये गोंधळ जागरणमधून रात्र जागवणारे गोंधळी बदलत्या काळातही  पारंपारिक लोककला जोपासत आहेत. आधुनिकतेचा काळ असताना देखील प्राध्यापक हरिभाऊ भिसे व त्यांचे सहकारी आपली वार्षिके जबाबदारी म्हणून विविध गावांमध्ये गोंधळ उत्सवांमध्ये सहभागी होतात. त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद आहे.लोकसंस्कृतीत गोंधळी कलाकार गोंधळ जागरणच्या माध्यमातून बतावणी करत लोककलेचा वारसा जोपासण्याचं काम करत आहेत. त्यामुळे या पारंपारिक लोककला जोपासणा-या कलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं आपल्या सर्व समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन भगवान लोके मित्रमंडळ - अध्यक्ष , कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले.   असलदे येथे शिंदे कुटुंबियांच्या भवानी देवीच्या गोंधळ कार्यक्रमात भगवान लोके मित्रमंडळ व असलदे ग्रामस्थ मित्र...

सिंधुदुर्ग today

इमेज
साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्धम यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द, सदस्यत्व अबाधित. मुख्य निवडणूक आयुक्त यांचा आदेश.  ऍड. उमेश सावंत, ऍड . रघुवीर देसाई यांनी पाहिले काम  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) साकेडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रज्वल वर्दम यांनी ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणुकीतील निवडणूक खर्च विहित कालावधीमध्ये सादर न केल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अपात्र ठरविल्याचा दिलेला आदेश राज्याचें मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी रद्द केला आहे. तसेच श्री. वर्दम यांचे सभासदत्व पुर्नस्थापित करत अबाधित ठेवण्यात आले आहे. अर्जदार वर्दम यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत व अॅङ रघुवीर देसाई यांनी काम पाहिले. २०२२च्या साकेडी ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ चे उमेदवार असलेल्या प्रज्वल वर्दम हे बिनविरोध निवडून आले होते. विहित कालावधीमध्ये निवडणुकीचा खर्च सादर करताना त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र दाखल केले नव्हते. याबाबत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ब (१) अन्वये अर्जदार सुरज वर्दम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर झालेल्या सुनावणीअंती जिल्हाध...

सिंधुदुर्ग today

इमेज
वाळू  उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक संपन्न. कुडाळ मालवणच्या आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठक. सिंधुदुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर)  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूची उपलब्धता आणि प्रलंबित लिलाव प्रक्रियेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर,  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे , शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक व कंत्राटदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.  या बैठकीत वाघोठण नदी आणि विजयदुर्ग खाडीमधील प्रलंबित वाळू लिलाव प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कायदेशीर बाबींची पूर्तता आणि पर्यावरणीय शाश्वतता लक्षात घेऊन या प्रस्तावांची तांत्रिक तपासणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल विभागाला दिले. पारंपारिक 'डुबी' आणि 'हातपाटी' पद्धतीने वाळू काढण्याचे परवाने देण्...

सिंधुदुर्ग today

इमेज
शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन. पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद. सिंधुदुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर)  शिरोडा-वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न व चिंता जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण देत त्यांचे समाधान करण्यात आले. पालकमंत्री यावेळी म्हणाले की, शिरोडा-वेळागर येथे प्रस्तावित ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, पर्यटनाला चालना मिळेल तसेच परिसराचा आर्थिक विकास साधला जाईल. जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबवला जाईल. भविष्यातही अशाच प्रकारे स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करून विकासात्मक निर्णय घेतले जातील असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.    या बैठकीस आमदार आमदार दीपक केसरकर, निलेश राणे,जिल्हाधिकारी त...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी अजय कांडर यांना कवयित्री आशा पिळणकर स्मृती काव्य पुरस्कार  १८ जानेवारी रोजी बांदा येथे पुरस्काराचे वितरण बांदा/प्रतिनिधी         ज्येष्ठ कवी अजय कांडर यांना  श्री  श्री  श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज पॅरामुर ( तेलंगणा ) आणि बांदा परिवारातर्फे देण्यात येणारा पहिला कवयित्री आशा पिळणकर स्मृती काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून १८ जानेवारी २०२६ रोजी स.१०:३० वा.‘ स्वामी समर्थ हॉल‘ बांदा येथे होणाऱ्या पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळ्यात कांडर यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.           कवयित्री आशा पिळणकर यांनी विपुल बाल साहित्य लिहिले. एक शिक्षिका म्हणून निष्ठेने सेवाभावी वृत्तीने काम केले. आता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी पिळणकर कुटुंबातर्फे त्यांच्या बाल साहित्याचे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले असून यावर्षीपासून कवयित्री आशा पिळणकर काव्य पुरस्कारही सुरू करण्यात आला आहे. या पहिल्या पुरस्कारासाठी कवी अजय कांडर यांची निवड करण्यात आली असून पुरस्का...

सिंधुदुर्ग today

इमेज
वाळू, चिरेखाण व वेळागर प्रश्नी जनतेच्या शंकांचे निरसन. सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा;माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास. ओरोस (ऋषिकेश मोरजकर) जनतेच्या मनातील शंका कुशंका ज्या होत्या, त्या दूर केल्या. वाळू व्यवसायिकांचा जो प्रश्न होता त्यावर धोरण निश्चित होत नव्हते. त्यांना होणारा त्रास आणि विविध पद्धतीने होणाऱ्या चुकीच्या कारवाया या सर्व बाबतीत कुडाळ  मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार त्या - त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यानी सुध्दा  समस्या जाणून घेतली. व्यवसाय करणारे आमच्या जिल्ह्याचे, आमचे भूमिपुत्र आहेत. त्यांचा व्यवसाय सुरळीत करण्यात यावा, यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. आमदार निलेश राणे त्याबाबतीत आग्रही आहेत. त्यामुळे सर्व दृष्टिकोनातून मार्ग काढले जात आहेत अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्ह्यातील वाळू प्रश्न, चिरेखान व्यावसायिकांचे प्रश्न, वेळागर येथे फाईव्ह स्टार ताज हॉटेल प्रकल्प होणार आहे त्या ठिकाणच्या लोकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी बैठका पालकमंत्री नितेश राण...

सिंधुदुर्ग today

इमेज
  जानेवारी अखेर पर्यंत विकास कामे पूर्ण करा ; पालकमंत्री नितेश राणे जिल्हा परीषद आढावा बैठक संपन्न. निधी १०० टक्के खर्च करा ; कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करणार विकासकामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करा सिंधुदुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परीषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. जिल्हा परीषदेने आराखड्यात घेतलेली विकास कामे  जानेवारी अखेर पर्यंत गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परीषदेच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पुंड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री परब,  निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले,  तसेच जिल्हा परी...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हाधिकारी कार्यालयात BSNL चा ‘पोर्टेबल सेटअप’ कार्यान्वित ​पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बीएसएनएलची त्वरित कार्यवाही  जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात नेटवर्कच्या समस्येतून नागरिकांची सुटका ​जिल्ह्यातील १०२ टॉवर्सना वीज जोडणी : नवीन ३१ टॉवर्सनाही मंजुरी ​सिंधुदुर्ग |प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हयातील बीएसएनएल (BSNL) नेटवर्कची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी  बीएसएनएल विभागाला केलेल्या सूचनेनंतर त्वरित कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेटवर्कची असलेली गंभीर समस्या सोडवण्यासाठी ना. नितेश राणे यांच्या सूचनेनुसार तातडीने ‘पोर्टेबल सेटअप’ बसवण्यात आला असून, यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि संपूर्ण परिसरात बीएसएनएलचे नेटवर्क पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाले आहे. मुंबईतील बैठकीचा सकारात्मक परिणाम काही दिवसांपूर्वीच ना. नितेश राणे यांनी मुंबईत बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली होती. जिल्ह्यातील विस्कळीत सेवा आणि रेंजअभावी होणारी नागरिकांची गै...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे. सोमवारी सकाळी ०९.०० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने वैभवाडीकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा. जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग आयोजित वैभववाडी तालुक्यातील "बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार" महोत्सवास उपस्थिती ( संदर्भ: सुधीर नकाशे, तालुकाध्यक्ष वैभववाडी )सकाळी ११.०० वा. मोटारीने ओरोसकडे प्रयाण, दुपारी १२.३० वा. जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग मधील विकास कामांसदर्भात आढावा बैठक, दुपारी ०१.३० वा. शिरोडा वेळागर येथील हॉटेल ताजच्या जमिनीसंदर्भात बैठक ,दुपारी ०२,००. वा.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू प्रश्नांचावत बैठक ( उपस्थिती मा. आमदार श्री. निलेश राणे, ठिकाण - जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग )दुपारी ०२.३० वा. : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरे-खाण व्यवसायीकांच्या समवेत बैठक. सायंकाळी ५ वाजता. देवगड व वैभववाडी तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट तसेच देवगड पाणी पुरव...

सिंधुदुर्ग today

इमेज
सामाजिक कार्यकर्ते प्रदीप हरमलकर यांचा वाढदिवस वृध्दाश्रमला जीवनावश्यक वस्तू वाटप करीत साजरा  कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील असलदे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप हरमलकर यांचा आज ५३ वा वाढदिवस असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत याच ठिकाणी आजी आजोबा यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.        तांदूळ, तुरडाळ, गोडेतेल तसेच बिस्किटे असेच बरेच जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, विनोद आईर ,विजय राणे ,दिपक चव्हाण ,कमलाकर पाटील, उदय परब ,परशुराम परब, श्रीराम मोरजकर ,श्रीकृष्ण वांगणकर तसेच हरमलकर कुटुंबीय व वृद्धाश्रम संचालक ,कर्मचारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे आयशर टेम्पो संरक्षण कठड्यावर आदळून अपघात. सुदैवाने अपघात चालक अडकून ही किरकोळ जखमी.  कणकवली प्रतिनिधी  मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव दत्त मंदिर समोरील हायवेच्या वहाळा जवळील संरक्षण कठड्यावर आयशर टेम्पो आदळून अपघात झाला.सुदैवाने चालक आत अडकून ही किरकोळ जखमी होत बालंबाल बचावला आहे. सदर अपघात आज दुपारी बाराच्या सुमारास घडला. अपघात एवढा भीषण होता की आयशर टेम्पो संरक्षण कठडा ला आढळल्याने दर्शनी भागाचा पूर्णतः चक्काचूर झाला असून आयशर टेम्पो चालक आत मध्ये अडकला होता स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये, पांडुरंग मोरये, गुरुनाथ मोरये , संभाजी पाटील, अनिकेत बिडये ,गुरु साळुंखे यांच्या मदतीने तसेच या ठिकाणी हुन प्रवास करणारे एस .टी .चालक व वाहक यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. व नरेंद्र महाराजांच्या रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक पांडू तेली यांनी त्याला प्रथम उपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविले आहे. व त्याच्यावर उपचार सुरू आहेत.सुदैवाने चालक बालंबाल बचावला आहे यामुळे या ठिकाणी काही काळ एकेरी वाहतूक सुरू आहे.     या ...

सिंधुदुर्ग today

इमेज
एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांना राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित. तळेरे (प्रतिनिधी)  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांना राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील शिक्षकरत्न पुरस्कार वन परिक्षेत्र अधिकारी (गगनबावडा) श्री. अशोक राऊत यांच्या शुभहस्ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथील सभागृहात भरगच्च उपस्थितीत गौरव‌ महाराष्ट्राचा, सोहळा आनंदाचा २०२५ या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.  या पुरस्कार सोहळ्यात व्यासपिठावर राज्याचे माजी रोजगार हमी राज्यमंत्री बी.  एस्. पाटील, सिने अभिनेत्री श्वेता सुतार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या (कोल्हापूर)  पोलिस उपअधीक्षक वैष्णवी सुरेश पाटील, गुरूवर्य काका महाराज बोरवणकर, सांगलीचे जीएसटी निरीक्षक राजवर्धन पाटील, सांगलीच्या एक्साईज उपनिरीक्षक सौ. वर्षा राजवर्धन पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वासराव सुतार, पत्रकार संपादक उत्तमराव कागले, अखिल भारतीय विश्वकर्मा वंशीसेनेचे गोवा प्रभारी शिवाजीराव सुतार, हायपरटेकचे सीईओ संकेत कुंजीर, उद्योजक सुरेश नाईक, उद्योजक मंगेश...

सिंधुदुर्ग today

इमेज
आयडियल इंग्लिश स्कूलची जी प्रगती वाखण्याजोगी- भगवान लोके आयडियल इंग्लिश स्कूल  उत्सव २०२५ स्नेह संमेलन पारितोषिक वितरण समारंभ ;रंगोत्सव या राज्यस्तरीय स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचाही गुणगौरव  कणकवली दि.२४ डिसेंबर : आयडियल इंग्लिश स्कूलची जी प्रगती झालेली आहे, ही वाखण्याजोगी आहे.जिल्ह्यातील एक नामांकित इंग्लिश स्कूल म्हणून आयडियल स्कूलचे नाव घेत आहेत.कारण संस्था चालवणे आणि विद्यार्थ्यांना चांगले संस्कार करणे आणि संस्था नाव नावारूपात आणणे ही गोष्ट आत्ताच्या काळात सोपी राहिलेली नाही. डॉ. विद्याधर तायशेटे आणि प्रा. हरिभाऊ भिसे,बुलंद पटेल हे संस्थेचा वसा घेऊन अहोरात्र मेहनत करत आहेत. त्याला शिक्षकांची आणि मुलांचीही साथ मिळाली आहे. आजचा विद्यार्थी हा देश,कुटुंब आणि समाजाचा भविष्य आहे,त्यासाठी विद्यार्थ्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. विद्यार्थांनी पुढील जीवनात आपल्या देशाचे,  जिल्ह्याचे , गावाचे ,आपल्या स्कूल नावलौकिक करणं ही प्रत्येक विद्यार्थीची जबाबदारी आहे ,असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले. आयडियल इंग्लिश स्कूल ऑफ ज्युनियर कॉले...

सिंधुदुर्ग today

इमेज
सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे सवलतीच्या दरात विविध वस्तू प्रदर्शनचे आज झाले उद्घाटन.  सवलतीच्या दरात खरेदीसाठी गर्दी. कणकवली देवगड व वैभववाडी साठी नांदगाव येथे मध्यवर्ती कार्यक्रम. अल्प दरात मिळणार आटा चक्की, शिलाई मशीन व एलईडी टीव्ही.  कणकवली /प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग आयोजित महिला सक्षमीकरण, सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे भरघोस सवलतीच्या दरात विविध वस्तू वितरणाचा कार्यक्रम शुभारंभ नांदगाव येथील ओटव फाटा नजिकच्या हायवे ब्रिज लगत असलेल्या तलाठी कार्यालय बाजूच्या गाळा येथे आज नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.    कणकवली, देवगड व वैभववाडी साठी नांदगाव येथे मध्यवर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.         यावेळी कैलास राणे, मंगेश गुरव ,सौ.सरिता राऊत , निरज मोरये,राजू तांबे , नांदगाव महसूल अधिकारी चौगुले, प्राची मोरये तसेच स्वाभिमान चे सदस्य उपस्थित होते.      यामध्ये आटा चक्की, शिलाई मशी...

सिंधुदुर्ग today

इमेज
सत्य सांगणारा साहित्यिक भ्रष्ट सत्तेच्या विरोधातच असतो. दुसऱ्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष अजय कांडर यांचे प्रतिपादन. कणकवली /प्रतिनिधी      साहित्यिक आणि सत्ताधारी व्यवस्था यांचे सख्य कधीच नसते. कारण लेखक कवीला समाजातील सत्य सांगून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभे राहायचे असते आणि सत्ताधारी व्यवस्था नेहमीच समाजाला गृहीत धरून काम करत राहत असते.त्यामुळेच सत्य सांगणारा साहित्यिक भ्रष्ट सत्तेच्या विरोधातच असतो. आज मात्र या उलट झालं असून साहित्यिक आणि सत्ताधारी व्यवस्था मांडीला मांडी लावून बसत असल्यामुळे समाज साहित्यिकांकडूनही आणि सत्ताधारी व्यवस्थेकडूनही अपेक्षा बाळगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी दुसऱ्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना येथे केले.        सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेचे दुसरे सम्यक संबोधी साहित्य संमेलन शहरातील नगर वाचनालयाच्या सभागृहात कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना कांडर यांनी स्वायत्तता टिक...

सिंधुदुर्ग today

इमेज
शिवापूर ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव 24 व 25 डिसेंबर रोजी  शिवापूर (ता. कुडाळ)  कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावचे ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव आज बुधवार 24 व 25 डिसेंबर  रोजी होणार आहे. आज  बुधवार 24 रोजी ग्रामदैवत श्री देव रवळनाथाच्या मंदिरात जत्रोत्सव होईल तर गुरवारी 25 डिसेंबर रोजी श्री देव भैरीच्या मंदिरात जत्रोत्सव होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व मानकर्यांच्या  वतीने करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेंद्र उर्फ पपी वांयगणकर. २८ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम.  कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेंद्र उर्फ पपी वांयगणकर यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही २८ जानेवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे. यामध्ये कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष -सुरेंद्र उर्फ पपी वांगणकर उपाध्यक्ष - गोपाळ  मोरये, सचिव -ऋषिकेश मोरजकर ,खजिनदार -दिलीप फोंडके ,सहसचिव - प्रल्हाद कारेकर, सहखजिनदार - बक्कर नावलेकर सदस्य - मजिद बटवाले, संतोष मिराशी , समीर बोभाटे, यशवंत सदडेकर , सुभाष घुगरे, रघुनाथ लोके, सुनील साळुंखे, मंगेश गुरव ,श्रीकांत टाकळे तर सल्लागार म्हणून नागेश मोरये, पंढरी वायंगणकर,रविराज मोरजकर, राजेंद्र मोरजकर, कमलाकर महाडिक, रज्जाक बटवाले आदी सभासदा़ंची कार्यकारिणी करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश. सिंधुदुर्गनगरी दि २३ (प्रतिनिधी ) :- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवार (दि 22 रोजी) घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत राज्यस्तरीय योजना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.   या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन 2024-25 व 2025-26 या कालावधीतील योजनानिहाय व कामनिहाय स्थिती तपासण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आलेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश तसेच प्रत्यक्ष कामांची सद्यस्थिती याबाबत संबंधित यंत्रणांकडून अहवाल मागविण्यात आले होते. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी...

सिंधुदुर्ग today

इमेज
महिला सक्षमीकरण सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे भरघोस सवलतीच्या दरात विविध वस्तू. अल्प दरात मिळणार आटा चक्की, शिलाई मशीन व एलईडी टीव्ही  उद्या होणार नांदगाव येथे शुभारंभ. कणकवली /प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग आयोजित महिला सक्षमीकरण, सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे भरघोस सवलतीच्या दरात विविध वस्तू वितरणाचा कार्यक्रम शुभारंभ नांदगाव येथील ओटव फाटा नजिकच्या हायवे ब्रिज लगत असलेल्या पटेल यांच्या येथे होणार आहे. यामध्ये आटा चक्की, शिलाई मशीन , एलईडी टीव्ही आणि सायकल या वस्तू भरघोस सवलतीच्या दरात मिळणार आहेत.      बांधकाम कामगार घरेलू कामगार माथाडी कामगार सर्व प्रकारचे संघटित व असंघटित कामगार व शेतकरी वर्गासाठी तसेच समस्त सिंधुदुर्गवासीयांसाठी या सवलती मिळणार आहेत. नांदगाव येथे २४ डिसेंबर ते १५ जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. तरी जास्तीत जास्त जनतेने येथे या वस्तू पहा ,खात्री करा आणि खरेदी करा. असे आवाहन आयोजक सौ. सरीता राऊत व  निरज मोरये नांदगाव यांनी केले आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क ...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग पर्यटनाला पंचतारांकित झळाळी! वेंगुर्लेतील शिरोडा–वेळाघर येथे ‘ताज’ समुहाचे जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित हॉटेल उभे राहणार पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न ; स्थानिकांना निर्माण होणार रोजगार जिल्ह्यासाठी ठरणार ऐतिहासिक निर्णय सिंधुदुर्गनगरी दिनांक २३ (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा–वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित (५ स्टार) हॉटेल उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळक ओळख निर्माण होणार आहे.सिंधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री  नितेश राणे यांनी विशेष पुढाकार घेतला असून त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. शिरोडा–वेळाघर येथील जमिनीबाबत मे. इंडियन हॉटेल कंपनी प्रा. लि. (ताज समुह) यांनी सादर केलेल्या पुरक करार पत्रावर चर्चा...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव दशक्रोशीत अयोध्या श्री राम मंदिर व्दितीय वर्धापन दिनानिमित्त... नांदगाव दशक्रोशीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने १ जानेवारीला भव्य मोटर सायकल रॅली  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  सकल हिंदू समाज नांदगाव दशक्रोशी च्या वतीने अयोध्या श्री राम मंदिर व्दितीय वर्धापन दिनानिमित्त यावर्षी गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६  रोजी संपूर्ण देशभर उत्साहात साजरा होणार  आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यंदाही नांदगाव दशक्रोशीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सदर नांदगाव तिठा येथून श्री रामाच्या मुर्तीची पुजा विधी  गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६  रोजी सकाळी ९ वा. लगेचच सकाळी ९.३० वा. रॅलीला सुरुवात होणार आहे. नांदगाव तिठा ते नांदगाव मोरयेवाडी श्रीराम मंदिर येथे आरती तेथून नांदगाव गोसावी कुंभारवाडी श्री राम मंदिर येथे आरती तसेच येथून ओटव ,आयनल ,कोळोशी असलदे मार्गे नांदगाव तिठा ते तोंडवली बोभाटेवाडी श्री हनुमान मंदिर व तिथे आरती व पुन्हा नांदगाव तिठा येथे आगमन व नांदगाव तिठा येथे महा आरती होणार आहे. तरी सकल हिंदू समाज यांनी बहुसंख्येने उपस्थित र...

सिंधुदुर्ग today

इमेज
नवनिर्वाचित कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा अल्पसंख्याक मार्फत झाला सत्कार. कणकवली प्रतिनिधी  राज्यातील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत कणकवली शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांचा तसेच  नगरसेवक म्हणून सुशांत नाईक विजयी  झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक  यांनी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जिद बटवाले व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.        यावेळी उस्मान बटवाले राजा नवलेकर , अजीम नावलेकर ,मोबीन साठविलकर ,असिफ बटवाले ,अलीम बटवाले ,अंजर  बटवाले ,ताहीर साठविलकर ,खुदबुद्दीन नावलेकर ,मुनाफ नावलेकर, शाहिद बटवाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

सिंधुदुर्ग today

इमेज
  डॉ. अमुल पावसकर यांना आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल ' आश्रम पुरस्कार' जाहीर बांदा /प्रतिनिधी          सावंतवाडी येथील स्वरूप हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध जनरल सर्जरन डॉ. अमुल महादेव पावसकर यांना त्यांच्या वैद्यकिय क्षेत्रातील अतुलनीय सेवाभावी कार्याबद्दल श्री  श्री  श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज पॅरामुर ( तेलंगणा ) आणि बांदा परिवारातर्फे देण्यात येणारा पहिला 'आश्रम पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.  पाच हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता‘ स्वामी समर्थ हॉल‘ बांदा येथे होणाऱ्या पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळ्यात आश्रम  पुरस्काराने डॉ. पावसकर यांना गौरविण्यात येणार आहे.         डॉ. अमुल पावसकर यांची विख्यात जनरल सर्जजन अशी ओळख आहे., एफमास, एफएआयएस, एफआयएजेस ,ज्येष्ठ जनरल व मिनिमल ॲक्सेस सर्जन, जीआय एन्डोस्कोपिस्ट,ग्रामीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ अशी ख्याती असलेले डॉ.पावसकर हे सिंधुदुर्गातील एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांचे वडील महादेव पावसकर बी. डी. ओ.ह...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्गातील दोषी आरोग्य आस्थापनांवर कारवाई करा. कणकवलीतील सामाजिक कार्यकर्त्यांची पालकमंत्री नितेश राणेंकडे मागणी : मुंबई नर्सिंग होम अ‍ॅक्टप्रमाणे कारवाई करण्याचा पालकमंत्र्यांचा यंत्रणेला आदेश. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या दोषी शासकीय व खाजगी आरोग्य व्यवस्था व खासगी अस्थापना आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. गोरगरीब रुग्णांना जिल्ह्यातील आरोग्य सेवा माफक दरात मिळाली पाहिजे. त्यासाठी खासगी रुग्णालयांच्या दर्शनी दरपत्रक लावावीत. पॅकेज स्वरुपात आरोग्य स्वरुपात चाललेली प्रॅक्टिस रुग्णांना त्रासदायक आहे ; ती त्वरित बंद करण्यात यावी. सरकारी आरोग्य व्यवस्थेतही काही डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य यंत्रणा कुचकामी व कमकुवत केली जात आहे. त्याची चौकशी व्हावी. या आरोग्य व्यवस्थेवर मुंबई नर्सिंग होम अ‍ॅक्टप्रमाणे कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करण्यात आली. त्यानुसार मंत्री नितेश राणे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुबोध इंगळे यांना मुंबई नर्सिंग अ‍ॅक्टप्रमाणे कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रसंगी आस्थापना कुलुपबंदही क...

सिंधुदुर्ग today

इमेज
या मासेमारी हंगामातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परप्रांतीय नौकेवरील ६ वी मोठी कार्यवाही. देवगड प्रतिनिधी  महाराष्ट्राच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग सदैव सजग राहून कार्यरत आहे. परप्रांतीय नौकांद्वारे होणाऱ्या बेकायदा मासेमारीला आळा घालण्यासाठी विभाग कठोर पावले उचलत आहे. याच धोरणाचा भाग म्हणून, आज पहाटे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ट्रॉलिंगद्वारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील एका मासेमारी नौकेवर यशस्वी धडक कारवाई करण्यात आली. दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे सुमारे ०४:३० वाजता देवगड समोर सागरी हद्दीत अंदाजे १४ वावात ही नौका मासेमारी करताना आढळली. गस्ती पथकाच्या नौकेजवळ पोहोचताच सदर नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पथकाने तिचा पाठलाग करून यशस्वीपणे नौका ताब्यात घेतले. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तथा सुधारित अधिनियम २०२१ च्या तरतुदींनुसार ही बेकायदा मासेमारी सिद्ध झाल्याने नौका जप्त करण्यात आली. *जप्त नौकेची माहिती* : •  *नौकेचे नाव :* महारथी •  *नोंदणी क्रमांक :* IND-KA-02-MM-६११...

सिंधुदुर्ग today

इमेज
  खासदार नारायण राणेंचे एक मागणी पत्र; सिंधुदुर्गात ३१ ठिकाणी फाय जी टॉवर मंजूर. खासदार राणेंच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात  होतो आहे फाय जी नेटवर्कचा विस्तार. बीएसएनएल कडून मंजूर मोबाईल टॉवरची यादी जाहीर. सिंधुदुर्ग : (ऋषिकेश मोरजकर) भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ ठिकाणी फाय जी मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कडून या मंजुरीची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.     यात देवगड तालुक्यातील हिंडळे, कुणकवन, महाळुंगे,मोंड, फणसगाव, पोयरे,तळवडे, तांबडेग,तिरलोट-दाभोळे कातकरवाडी,विठ्ठलादेवी, वेळगिवे  अशी गावे देवगड तालुक्यातील आहेत तर दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे गावात टॉवर मंजूर झाला आहे. कणकवली तालुक्यात ओटव फोटो घात टॉवर मंजूर झालेला आहे. कुडाळ तालुक्यात कालेली,कुसगाव या गावांसाठी टॉवर मंजूर झालेले आहेत. मालवण तालुक्यात बागवाडी, धामापूर,निरोम,राठिवडे, सावंतवाडी तालुक्यात पडवे, माजगाव, सातोळी तर्फ सातार्डा,तांबोळी या गावांना टॉवर मंजूर झालेले आहेत तर वैभ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वनराई बंधारा  स्तुत्य उपक्रमाचे पं.स. स्तरावरुन कौतुक  गेल्या वर्षी या उपक्रमांमुळे वाढली होती विहिरींची पाणीपातळी  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  पंचायत समिती कणकवली यांच्या  आवाहनानुसार वनराई बंधारे / कच्चे बंधारे  पाणी साठवणूक व जलसंवर्धनाच्या दृष्टीने वनराई बंधारे / कच्चे बंधारे बांधणे याबाबत केलेल्या आवाहनास अनुसरून नांदगाव  ग्रामपंचायत क्षेत्रात नांदगाव पाटवणेवाडी यथील महापुरुष मंदिर नजिक बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे चांगल्याप्रकारे उपक्रम राबविण्यात आल्याने पंचायत समिती स्तरावरुन नांदगाव ग्रामपंचायत व पूर्ण टिम चे कौतुक केले  आहे  या उपक्रमामुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास, शेतीस व पिण्याच्या पाण्यास लाभ होण्यास तसेच संभाव्य पाणीटंचाई कमी करण्यास निश्चितच मदत होणार आहे. गेल्या वर्षी ही नांदगाव ग्रामपंचायत मार्फत ज्या ज्या ठिकाणी पाणी अडवता येईल त्या प्रत्येक ठिकाणी कच्चे बंधारे बांधून पाणी अडविले होते. यामुळे गत वर्षी विहिरींची पाणीपातळी वाढली होती.     या...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव चा उद्या दहीकाला जत्रोत्सव ; आज आहेत रेकॉर्ड डान्स स्पर्धा. उद्या दहिकाला जत्रौत्सव निमित्त बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा नाट्यप्रयोग होणार सादर. कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील श्री राम सेवा ट्रस्ट गोसावी कुंभारवाडी नांदगाव आयोजित श्री राम मंदिर नांदगाव दहीकाला जत्रौत्सव उद्या शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.या निमित्ताने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तसेच आज शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अनुक्रमे तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.      तसेच उद्या शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी दहिकाला जत्रौत्सव निमित्ताने सकाळी 10 वा.पुजा विधी,  साय. 7 ते 9.30 वा. पर्यंत भजने , रात्री 10 ते 12  वाजेपर्यंत श्री राम पालखी सोहळा रात्री 12 वा.श्री बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या आज व उद्या होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री राम सेवा ट्रस्ट नांदगाव गोसाव...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवली प्रतिनिधी  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २० डिसेंबर रोजी  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक बैठकांना  उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते ,जनता यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
  गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती - मंत्री नितेश राणेंची माहिती; मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. मुंबई : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या समितीचे सह-अध्यक्ष म्हणून महसूल मंत्री, वन मंत्री आणि मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री राणे यांनी मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी या निर्णयाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. मी स्वतः या समितीचा सदस्य आहे. काही ठिकाणी थडगी उभी करून हिरवी चादर टाकली जाते. अशी थडगी किंवा अनधिकृत बांधकामे हटवायला गेले की लोक जमा होतात. अनेक वेळा अशा ठिकाणी हत्यारेही सापडली आहेत. इतिहास पुसण्याचे काम जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून हो...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे सिंधुदुर्ग टुडे दिनदर्शिकेचे प्रकाशन.  सलग तिसऱ्या वर्षी नांदगाव परिसरात दिनदर्शिकेचे मोफत वाटप. सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित. कणकवली /प्रतिनिधी     सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सलग तिसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग टुडे  २०२६ ची दिनदर्शिकेचे आज नांदगाव सरपंच भाई मोरजकर, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.      यावेळी सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल चे संपादक ऋषिकेश मोरजकर, सेवानिवृत्त पोलिस हवालदार गवस साटविलकर , नांदगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू तांबे, रज्जाक बटवाले, सावडाव ग्रामपंचायत सदस्य व शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार विजेते 2025 चे विजेते श्री अजय जाधव, शामसुंदर मोरजकर, रघुनाथ लोके, श्री पोकळे, तसेच बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.        यावेळी मोफत दिनदर्शिका सर्वांना वाटप करण्यात आली.

सिंधुदुर्ग today

इमेज
  ई- पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांना आवाहन. ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे १७ ते २४ डिसेंबर पर्यंत पिकांची नोंद करावी.  ग्रामस्तरीय समिती संयुक्तपणे  करणार स्थळ पाहणी.   सिंधुदुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर)  राज्यात खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करणेबाबत दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे. तसेच  खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पहाणी करणेबाबत मंडळ अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम २०२५ मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दिनांक १७ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ पर्यंत पिकांची नोंद करणेकरिता अर्ज सादर करावेत. तसेच संबंधित शेतकरी यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दाखल केलेल्या...

सिंधुदुर्ग today

इमेज
  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आदिशक्ती अभियानाचा आढावा. सिंधुदुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर)  जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आदिशक्ती अभियानात उत्साहाने सहभागी व्हावे. ग्रामपंचायतींनी केलेल्या स्वगुणांकनाची तालुकास्तरीय आदिशक्ती समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी करून, तालुक्यात उत्कृष्टपणे आदिशक्ती अभियान राबविणाऱ्या तीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. तसेच संबंधित ग्रामपंचायतींना भेटी देऊन त्यांनी केलेल्या कामाचे भौतिक निरीक्षण करण्यावर विशेष भर देण्याचेही त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या आदिशक्ती अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक १५ डिसेंबर रोजी पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर समित्यांनी आदिशक्ती पुरस्कारासाठी केलेल्या स्वगुणांकनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महिला स्नेही वातावरण निर्मिती प्रशिक्षण, सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन आदी निकषांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या माध्यमातून जिल्ह्याती...

सिंधुदुर्ग today

इमेज
  तेलंगण येथील भारतीय कला महोत्सवात डॉ.निर्मोही फडके यांचा सहभाग. स्त्री सशक्तीकरण आणि पश्चिम प्रदेशांतील साहित्य विषयासाठी निमंत्रण. कणकवली/प्रतिनिधी        साहित्य अकादमी, दिल्ली आणि संस्कृती मंत्रालय मध्यदक्षिणी सांस्कृतिक केंद्र ह्यांच्या संयुक्त विद्यमाने तेलंगणातील राष्ट्रपती भवन येथे आयोजित केल्या गेलेल्या 'भारतीय कला महोत्सवसाठी मूळ कोकणातील आणि सध्या ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉ.निर्मोही फडके यांना स्त्री सशक्तीकरण आणि पश्चिम प्रदेशांतील साहित्य विषयासाठी निमंत्रित केले गेले. भारतीय पातळीवरच्या अशा बहुभाषी महोत्सवासाठी निमंत्रित केल्या गेलेल्या कोकणातील त्या पहिल्याच लेखिका असून त्यांच्या या निवडीबद्दल कोकणच्या साहित्य वर्तुळातून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.             राष्ट्रपती निलयम' ह्या ऐतिहासिक स्थानाच्या अवाढव्य परिसरात साजऱ्या झालेल्या ह्या भव्य  कला महोत्सवाचे उद्घघाटन भारताच्या राष्ट्रपती सन्माननीय द्रौपदी मुर्मू ह्यांच्या हस्ते झाले.हिंदीमध्ये झालेल्या ह्या चर्चासत्रात मराठी भाष...