सिंधुदुर्ग today
सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे सवलतीच्या दरात विविध वस्तू प्रदर्शनचे आज झाले उद्घाटन.
सवलतीच्या दरात खरेदीसाठी गर्दी.
कणकवली देवगड व वैभववाडी साठी नांदगाव येथे मध्यवर्ती कार्यक्रम.
अल्प दरात मिळणार आटा चक्की, शिलाई मशीन व एलईडी टीव्ही.
कणकवली /प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग आयोजित महिला सक्षमीकरण, सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे भरघोस सवलतीच्या दरात विविध वस्तू वितरणाचा कार्यक्रम शुभारंभ नांदगाव येथील ओटव फाटा नजिकच्या हायवे ब्रिज लगत असलेल्या तलाठी कार्यालय बाजूच्या गाळा येथे आज नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.
कणकवली, देवगड व वैभववाडी साठी नांदगाव येथे मध्यवर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
यावेळी कैलास राणे, मंगेश गुरव ,सौ.सरिता राऊत , निरज मोरये,राजू तांबे , नांदगाव महसूल अधिकारी चौगुले, प्राची मोरये तसेच स्वाभिमान चे सदस्य उपस्थित होते.
यामध्ये आटा चक्की, शिलाई मशीन , एलईडी टीव्ही आणि सायकल या वस्तू भरघोस सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आज महिलांनी अल्प दरातील शिलाई मशीन खरेदी करुनही या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तरी जास्तीत जास्त जनतेने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या उद्घाटन नंतर सवलतीच्या दरातील खरेदीसाठी गर्दी झाली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा