सिंधुदुर्ग today
महिला सक्षमीकरण सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव
येथे भरघोस सवलतीच्या दरात विविध वस्तू.
अल्प दरात मिळणार आटा चक्की, शिलाई मशीन व एलईडी टीव्ही
उद्या होणार नांदगाव येथे शुभारंभ.
कणकवली /प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग आयोजित महिला सक्षमीकरण, सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे भरघोस सवलतीच्या दरात विविध वस्तू वितरणाचा कार्यक्रम शुभारंभ नांदगाव येथील ओटव फाटा नजिकच्या हायवे ब्रिज लगत असलेल्या पटेल यांच्या येथे होणार आहे. यामध्ये आटा चक्की, शिलाई मशीन , एलईडी टीव्ही आणि सायकल या वस्तू भरघोस सवलतीच्या दरात मिळणार आहेत.
बांधकाम कामगार घरेलू कामगार माथाडी कामगार सर्व प्रकारचे संघटित व असंघटित कामगार व शेतकरी वर्गासाठी तसेच समस्त सिंधुदुर्गवासीयांसाठी या सवलती मिळणार आहेत.
नांदगाव येथे २४ डिसेंबर ते १५ जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. तरी जास्तीत जास्त जनतेने येथे या वस्तू पहा ,खात्री करा आणि खरेदी करा. असे आवाहन आयोजक सौ. सरीता राऊत व निरज मोरये नांदगाव यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क 7219881588/845977 2373

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा