सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे आयशर टेम्पो संरक्षण कठड्यावर आदळून अपघात.

सुदैवाने अपघात चालक अडकून ही किरकोळ जखमी. 

कणकवली प्रतिनिधी 

मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव दत्त मंदिर समोरील हायवेच्या वहाळा जवळील संरक्षण कठड्यावर आयशर टेम्पो आदळून अपघात झाला.सुदैवाने चालक आत अडकून ही किरकोळ जखमी होत बालंबाल बचावला आहे.

सदर अपघात आज दुपारी बाराच्या सुमारास घडला. अपघात एवढा भीषण होता की आयशर टेम्पो संरक्षण कठडा ला आढळल्याने दर्शनी भागाचा पूर्णतः चक्काचूर झाला असून आयशर टेम्पो चालक आत मध्ये अडकला होता स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये, पांडुरंग मोरये, गुरुनाथ मोरये , संभाजी पाटील, अनिकेत बिडये ,गुरु साळुंखे यांच्या मदतीने तसेच या ठिकाणी हुन प्रवास करणारे एस .टी .चालक व वाहक यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. व नरेंद्र महाराजांच्या रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक पांडू तेली यांनी त्याला प्रथम उपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविले आहे. व त्याच्यावर उपचार सुरू आहेत.सुदैवाने चालक बालंबाल बचावला आहे यामुळे या ठिकाणी काही काळ एकेरी वाहतूक सुरू आहे.

    या अपघाताची खबर नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी बिट अंमलदार चंद्रकांत झोरे यांना कळवताच अपघातस्थळी बिट अंमलदार चंद्रकांत झोरे, श्री जगताब, घाडी दाखल झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today