सिंधुदुर्ग today
एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांना राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित.
तळेरे (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांना राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील शिक्षकरत्न पुरस्कार वन परिक्षेत्र अधिकारी (गगनबावडा) श्री. अशोक राऊत यांच्या शुभहस्ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथील सभागृहात भरगच्च उपस्थितीत गौरव महाराष्ट्राचा, सोहळा आनंदाचा २०२५ या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यात व्यासपिठावर राज्याचे माजी रोजगार हमी राज्यमंत्री बी. एस्. पाटील, सिने अभिनेत्री श्वेता सुतार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या (कोल्हापूर) पोलिस उपअधीक्षक वैष्णवी सुरेश पाटील, गुरूवर्य काका महाराज बोरवणकर, सांगलीचे जीएसटी निरीक्षक राजवर्धन पाटील, सांगलीच्या एक्साईज उपनिरीक्षक सौ. वर्षा राजवर्धन पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वासराव सुतार, पत्रकार संपादक उत्तमराव कागले, अखिल भारतीय विश्वकर्मा वंशीसेनेचे गोवा प्रभारी शिवाजीराव सुतार, हायपरटेकचे सीईओ संकेत कुंजीर, उद्योजक सुरेश नाईक, उद्योजक मंगेश एम. लोहार, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अनिल बाळू सुतार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
माझ्या आयुष्यात ज्यांनी ज्यांनी मला काहीतरी शिकवले आहे, शाळेचा अभ्यास असो की अन्य काहीही, त्या सर्व मान्यवर शिक्षकवृंदाला हा पुरस्कार समर्पित करीत आहे. कारण त्यांच्यामुळेच सिमेंटच्या पिशव्या उचलून हमाली करणारा सदाशिव पांचाळ ते जगातल्या विविध देशांतील लोकांना मार्गदर्शन करणारा सदाशिव पांचाळ हा प्रवास पुर्णत्वास आला आहे, अशी प्रतिक्रिया सदाशिव पांचाळ यांनी पुरस्कार स्विकारल्या नंतर दिली.
गेल्यावर्षी मिळालेला कलातपस्वी कै. आपा काणेकर स्मृती व्यक्तीमत्व प्रेरणा पुरस्कार त्यांनी आपल्या आई- वडीलांना समर्पित केला होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा