सिंधुदुर्ग today
आयडियल इंग्लिश स्कूलची जी प्रगती वाखण्याजोगी- भगवान लोके
आयडियल इंग्लिश स्कूल उत्सव २०२५ स्नेह संमेलन पारितोषिक वितरण समारंभ ;रंगोत्सव या राज्यस्तरीय स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचाही गुणगौरव
कणकवली दि.२४ डिसेंबर :
आयडियल इंग्लिश स्कूलची जी प्रगती झालेली आहे, ही वाखण्याजोगी आहे.जिल्ह्यातील एक नामांकित इंग्लिश स्कूल म्हणून आयडियल स्कूलचे नाव घेत आहेत.कारण संस्था चालवणे आणि विद्यार्थ्यांना चांगले संस्कार करणे आणि संस्था नाव नावारूपात आणणे ही गोष्ट आत्ताच्या काळात सोपी राहिलेली नाही. डॉ. विद्याधर तायशेटे आणि प्रा. हरिभाऊ भिसे,बुलंद पटेल हे संस्थेचा वसा घेऊन अहोरात्र मेहनत करत आहेत. त्याला शिक्षकांची आणि मुलांचीही साथ मिळाली आहे. आजचा विद्यार्थी हा देश,कुटुंब आणि समाजाचा भविष्य आहे,त्यासाठी विद्यार्थ्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. विद्यार्थांनी पुढील जीवनात आपल्या देशाचे, जिल्ह्याचे , गावाचे ,आपल्या स्कूल नावलौकिक करणं ही प्रत्येक विद्यार्थीची जबाबदारी आहे ,असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले.
आयडियल इंग्लिश स्कूल ऑफ ज्युनियर कॉलेजच्या उत्सव २०२५ या स्नेह संमेलन पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी संस्थेच उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे,सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर, सल्लागार डी. पी.तानावडे, अनंत बडे, श्रीमती बडे ,मुख्याध्यापिका अर्चना शेखर देसाई व मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात स्कॉलरशिप,ऑलंपियाड, तायक्वांदो,मल्लखांब, बुद्धिबळ अशा स्पर्धांमधील तालुका जिल्हा आणि राज्यपातळीवरील यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले . रंगोत्सव या राज्यस्तरीय स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचाही गुणगौरव करण्यात आला .
भगवान लोके म्हणाले,
आयडिया स्कूलचा इतिहास सुरुवातीच्या काळापासून गेला १७ ते १८ वर्षात आमच्या नजरेसमोर आहे. ही शिक्षण संस्था कशी उभी केली? संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे ,प्रा. हरिभाऊ भिसे आणि बुलंद पटेल हे फाउंडर मेंबर आहेत ही संस्था उभी करताना जो लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ही शिक्षण संस्था चालवणे म्हणजे सोपं काम नाही. ही चालवणारी सर्वसामान्य माणसे आहेत. प्रसंगी विद्यार्थी घडवण्यासाठी काही बँकांचे कर्ज काढून ही संस्था उभी केलेली आहे. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत.आताच्या विविध स्पर्धा वर्षभरात झाल्या त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण झालं. स्पर्धेत काही विद्यार्थी यशस्वी होतात, काहींना अपयश येते.विद्यार्थ्याच्या जीवनातील हे अपयश म्हणजे उद्याच्या यशाची पहिली पायरी आहे.असं समजून विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये आणि शिक्षणामध्ये मेहनत घेतली पाहिजे. जिद्द , चिकाटी आणि मेहनत ठेवली तर कुठलेही यश आपल्यापासून दूर नसतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात एक उद्दिष्ट ठेवून शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. शिक्षण घेत असताना शिक्षक आणि आई - वडील नेहमीच तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे आपुलकीने बघितलं पाहिजे. तुमच्या जीवनात जर बदल घडण्यासाठी मेहनत आवश्यक आहे. तुम्ही घडलात तर उद्या देशाचं आणि समाजाचं भलं होईल,तुमचं चांगलं भविष्य घडेल. विद्यार्थ्यांनी मोबाईल ,टीव्ही रिल्स या गोष्टी जेवढ्या चांगल्या आहेत, तेवढ्याच त्या घातक आहेत. त्यामुळे मर्यादित वेळेपलीकडे मोबाईल कडे जाणं आपल्या आयुष्यासाठी घातक असेल. आपल्या शरीरावर या गोष्टी परिणाम करणाऱ्या आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शिक्षकांनी शिकवणी करताना प्रामाणिकपणे लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर शिक्षक एका बाजूने शिकवत असतात ,आणि मागे बेंचवर बसून बोलत राहिल्याचा परिणाम तुम्हाला आता नाही, तर ज्यावेळी शिकून बाहेर पडालं, तेव्हा अपयशाच्या जीवनात त्यावेळी शिक्षक आणि आई-वडील सांगत असलेल्या गोष्टी लक्षात येतील. आणि त्यावेळी तुम्हाला निश्चितच पश्चाताप होईल. त्यावेळी तर आम्ही चांगले शिकलो असतो तर आज आम्ही घडलो असतो,असा पश्चात्ताप होईल. आम्ही बिघडलो तर त्या काळातील चुकीच्या गोष्टींमुळे बिघडलो, असे तुम्हाला वाटेल.तेव्हा वेळ निघून गेलेली असणार आहे.
संस्थेचे सेक्रेटरी प्रा. हरिभाऊ भिसे म्हणाले,आयडियल इंग्लिश स्कूल ही एक उपक्रमशील शाळा आहे. मुख्यमंत्री स्वच्छ शाळा अभियानात कौतुक झाले . विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकतात पण आयडियल स्कूल मधून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थी जेव्हा कणकवली कॉलेजला येतो,तेव्हा तो निश्चितच अभ्यासू आणि हुशार विद्यार्थी असतो. आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटावं असेच शिक्षण घ्या. आपल्या शाळेमध्ये आई-वडिलांना सन्मानासाठी बोलवा. काहीतरी गुन्हा करुन बोलवणे हे चुकीचं आहे. आई-वडिलांना आणि शिक्षकांना अभिमान वाटेल असं वागा.
कार्याध्यक्ष बुलंद पटेल म्हणाले ,ज्या मुलांना पारितोषिक मिळालेला आहे ,त्यांचे मी अभिनंदन करतो. या यशामध्ये अनेकांचे फार परिश्रम आहेत. आम्ही ही शाळा एका पत्र्याच्या शेडमध्ये चालू केलेली होती आणि तिथून एक सुज्ज इमारत पर्यंतचा हा प्रवास प्रवास सोपा नव्हता. या शाळेच्या उपक्रमांमध्ये जर कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांचा आहे. मला अभिमान आहे. आणि शाळेतील इतर जे स्टाफ आहे, त्यांचाही यामध्ये खूप योगदान आहे.
उपाध्यक्ष मोहन सावंत म्हणाले, शैक्षणिक जीवनात कष्टाच्या मेहनतीला हमखास मिळणार फळ म्हणजे हा पारितोषिक वितरण सोहळा आहे. खेळामध्ये स्कॉलरशिप मध्ये शारीरिक कलेमध्ये बक्षीस मिळाले आहे. विद्यार्थांना कौतुकाची थाप आपल्या पाठीवर कोणीतरी मारली पाहिजे. आमची मुलं वेगवेगळ्या स्तरावर यश मिळवत आहे. आम्हाला गुरुदक्षिणा म्हणून फक्त तुमचं यश द्या, तुमचं नाव रोशन करा.
क्रीडा प्रकारातील सर्वसाधारण हाऊस म्हणून ब्लू हाऊसला सन्मानित करण्यात आले आणि डिसिप्लिन म्हणून हाऊस ग्रीन हाऊस विजयी ठरले.सूत्रसंचालन शिक्षक हेमंत पाटकर आणि शिक्षिका शीतल बांदल यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा