सिंधुदुर्ग today

नांदगाव दशक्रोशीत अयोध्या श्री राम मंदिर व्दितीय वर्धापन दिनानिमित्त...

नांदगाव दशक्रोशीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने १ जानेवारीला भव्य मोटर सायकल रॅली 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

सकल हिंदू समाज नांदगाव दशक्रोशी च्या वतीने अयोध्या श्री राम मंदिर व्दितीय वर्धापन दिनानिमित्त यावर्षी गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६  रोजी संपूर्ण देशभर उत्साहात साजरा होणार  आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यंदाही नांदगाव दशक्रोशीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सदर नांदगाव तिठा येथून श्री रामाच्या मुर्तीची पुजा विधी  गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६  रोजी सकाळी ९ वा. लगेचच सकाळी ९.३० वा. रॅलीला सुरुवात होणार आहे. नांदगाव तिठा ते नांदगाव मोरयेवाडी श्रीराम मंदिर येथे आरती तेथून नांदगाव गोसावी कुंभारवाडी श्री राम मंदिर येथे आरती तसेच येथून ओटव ,आयनल ,कोळोशी असलदे मार्गे नांदगाव तिठा ते तोंडवली बोभाटेवाडी श्री हनुमान मंदिर व तिथे आरती व पुन्हा नांदगाव तिठा येथे आगमन व नांदगाव तिठा येथे महा आरती होणार आहे. तरी सकल हिंदू समाज यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाज नांदगाव दशक्रोशी च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today