सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे सिंधुदुर्ग टुडे दिनदर्शिकेचे प्रकाशन.
सलग तिसऱ्या वर्षी नांदगाव परिसरात दिनदर्शिकेचे मोफत वाटप.
सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित.
कणकवली /प्रतिनिधी
सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सलग तिसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग टुडे २०२६ ची दिनदर्शिकेचे आज नांदगाव सरपंच भाई मोरजकर, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल चे संपादक ऋषिकेश मोरजकर, सेवानिवृत्त पोलिस हवालदार गवस साटविलकर , नांदगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू तांबे, रज्जाक बटवाले, सावडाव ग्रामपंचायत सदस्य व शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार विजेते 2025 चे विजेते श्री अजय जाधव, शामसुंदर मोरजकर, रघुनाथ लोके, श्री पोकळे, तसेच बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी मोफत दिनदर्शिका सर्वांना वाटप करण्यात आली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा