सिंधुदुर्ग today
नांदगाव चा उद्या दहीकाला जत्रोत्सव ; आज आहेत रेकॉर्ड डान्स स्पर्धा.
उद्या दहिकाला जत्रौत्सव निमित्त बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा नाट्यप्रयोग होणार सादर.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील श्री राम सेवा ट्रस्ट गोसावी कुंभारवाडी नांदगाव आयोजित श्री राम मंदिर नांदगाव दहीकाला जत्रौत्सव उद्या शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.या निमित्ताने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तसेच आज शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अनुक्रमे तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच उद्या शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी दहिकाला जत्रौत्सव निमित्ताने सकाळी 10 वा.पुजा विधी, साय. 7 ते 9.30 वा. पर्यंत भजने , रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत श्री राम पालखी सोहळा रात्री 12 वा.श्री बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या आज व उद्या होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री राम सेवा ट्रस्ट नांदगाव गोसावी - कुंभारवाडी,पाटवणे वाडी यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा