सिंधुदुर्ग today
डॉ. अमुल पावसकर यांना आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल 'आश्रम पुरस्कार' जाहीर
बांदा /प्रतिनिधी
सावंतवाडी येथील स्वरूप हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध जनरल सर्जरन डॉ. अमुल महादेव पावसकर यांना त्यांच्या वैद्यकिय क्षेत्रातील अतुलनीय सेवाभावी कार्याबद्दल श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज पॅरामुर ( तेलंगणा ) आणि बांदा परिवारातर्फे देण्यात येणारा पहिला 'आश्रम पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. पाच हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता‘ स्वामी समर्थ हॉल‘ बांदा येथे होणाऱ्या पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळ्यात आश्रम पुरस्काराने डॉ. पावसकर यांना गौरविण्यात येणार आहे.
डॉ. अमुल पावसकर यांची विख्यात जनरल सर्जजन अशी ओळख आहे., एफमास, एफएआयएस, एफआयएजेस ,ज्येष्ठ जनरल व मिनिमल ॲक्सेस सर्जन, जीआय एन्डोस्कोपिस्ट,ग्रामीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ अशी ख्याती असलेले डॉ.पावसकर हे सिंधुदुर्गातील एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांचे वडील महादेव पावसकर बी. डी. ओ.होते.मात्र एक कवी आणि लेखक म्हणूनही त्यांची ख्याती होती.त्यांचे चार कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.आई गीता पावसकर यांचीही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही स्वतंत्र ओळख होती. आई-वडिलांचा हा लेखन आणि सामाजिक भावनेचा वारसा जपतच डॉ. पावसकर यांनी आपल्या आरोग्य सेवेची आणि काव्य लेखनाची वाटचाल सुरू ठेवली. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना मेडिकलच्या संशोधनात्मक उपक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले.जिल्ह्यातील पहिली एन्डोस्कोपी सुविधा सुरू करणारे शल्यचिकित्सक अशी त्यांची ओळख आहे.
वैद्यकीय योगदानाबरोबर एक कलावंत म्हणूनही डॉ. पावसकर यांची नावलौकिकता आहे.शास्त्रीय संगीत,हार्मोनियम व की-बोर्ड वादन, तत्त्वज्ञान, आत्मचरित्र व आध्यात्मिक साहित्य वाचन,पेन्सिल स्केचिंग आदी संदर्भात त्यांनी आपली आवड जोपासली असून सुमारे 1500 पेक्षा जास्त त्यांनी आजवर काव्य लेखन केले आहे. अमुल्यवाणी, तरंग, मृगजळ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध असून त्यांना नानिवडेकर साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉ. अमुल पावसकर यांना आश्रम पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याची माहिती श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज पॅरामुर ( तेलंगणा ) आणि बांदा परिवारातर्फे देण्यात आली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा