सिंधुदुर्ग today



सामाजिक कार्यकर्ते प्रदीप हरमलकर यांचा वाढदिवस वृध्दाश्रमला जीवनावश्यक वस्तू वाटप करीत साजरा 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील असलदे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप हरमलकर यांचा आज ५३ वा वाढदिवस असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत याच ठिकाणी आजी आजोबा यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. 

      तांदूळ, तुरडाळ, गोडेतेल तसेच बिस्किटे असेच बरेच जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.

यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, विनोद आईर ,विजय राणे ,दिपक चव्हाण ,कमलाकर पाटील, उदय परब ,परशुराम परब, श्रीराम मोरजकर ,श्रीकृष्ण वांगणकर तसेच हरमलकर कुटुंबीय व वृद्धाश्रम संचालक ,कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today