सिंधुदुर्ग today
नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वनराई बंधारा
स्तुत्य उपक्रमाचे पं.स. स्तरावरुन कौतुक
गेल्या वर्षी या उपक्रमांमुळे वाढली होती विहिरींची पाणीपातळी
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
पंचायत समिती कणकवली यांच्या आवाहनानुसार वनराई बंधारे / कच्चे बंधारे पाणी साठवणूक व जलसंवर्धनाच्या दृष्टीने वनराई बंधारे / कच्चे बंधारे बांधणे याबाबत केलेल्या आवाहनास अनुसरून नांदगाव ग्रामपंचायत क्षेत्रात नांदगाव पाटवणेवाडी यथील महापुरुष मंदिर नजिक बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे चांगल्याप्रकारे उपक्रम राबविण्यात आल्याने पंचायत समिती स्तरावरुन नांदगाव ग्रामपंचायत व पूर्ण टिम चे कौतुक केले आहे
या उपक्रमामुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास, शेतीस व पिण्याच्या पाण्यास लाभ होण्यास तसेच संभाव्य पाणीटंचाई कमी करण्यास निश्चितच मदत होणार आहे. गेल्या वर्षी ही नांदगाव ग्रामपंचायत मार्फत ज्या ज्या ठिकाणी पाणी अडवता येईल त्या प्रत्येक ठिकाणी कच्चे बंधारे बांधून पाणी अडविले होते. यामुळे गत वर्षी विहिरींची पाणीपातळी वाढली होती.
या स्तुत्य उपक्रमासाठी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, ग्रामपंचायत अधिकारी आर.डी. सावंत, ग्रामपंचायत सदस्या गौरी परब, कृषी सेवक श्री पवार , राजू खोत , सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आदी सहभागी झाले होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा