पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
मावळे आम्ही स्वराज्याचे संघटनेची स्वच्छ्ता मोहीम. वैभववाडी विभागाने किल्ले खारेपाटण येथे केली स्वच्छ्ता कणकवली (ऋषिकेश मोरजकर) मावळे आम्ही स्वराज्याचे संघटना महाराष्ट्र  वैभववाडी विभाच्या वतीने आज स्वच्छ्ता मोहीम किल्ले खारेपाटण येथे राबविण्यात आली . किल्ले खारेपाटण वर एकच ध्यास किल्ले खारेपाटण ला घेऊ द्यायचा मोकळा श्वास‌ अध्यक्ष सुमित कूशे यांच्या अध्यक्षेखाली,सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख सिद्धेश बडमे  यांच्या मार्गदर्शनाखाली ,वैभववाडी तालुका प्रमुख विशाल माने यांच्या नेतृत्वात नुकतेच स्वच्छता व संवर्धन मोहिम राबविण्यात आली  या मोहिमेत किल्ल्याची तटबंदी स्वच्छता व संवर्धन करण्यात आली या मोहिमेची सुरुवात गडदेवता व गडपुजन करुन मोहिमेस  प्रारंभ करण्यात आला या मोहिमेत सहभागी मावळे व रनरागीनी दिनेश मोहन माने माहिती व संपर्क अधिकरी वैभववाडी विभाग, निषा साळसकर सल्लागार वैभववाडी विभाग अक्षय तेली , प्रथम चव्हाण,अर्थव जाधव आदी सहभागी झाले होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ओटव प्रशालेत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना वाहण्यात आली श्रध्दांजली नांदगाव प्रतिनिधी  आज महाराष्ट्र राज्यातील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले असून त्यांना नांदगाव ओटव पूर्ण प्राथमिक शाळा येथे श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.        यावेळी मुख्याध्यापक आनंद तांबे,शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
सन्मित्र रिक्षा संघटना नांदगाव तर्फे २२ फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रम ट्रिकसीन नाट्यप्रयोग व्यंकटेश पद्मावती सायं.४ वा. डबलबारी भजनांचा जंगी सामना नांदगाव ऋषिकेश मोरजकर  कणकवली तालुक्यातील सन्मित्र रिक्षा संघटना नांदगाव च्या वतीने गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२४  रोजी श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.          कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी ९ वा.श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिर, सकाळी ११ पासून आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ ते २ महाप्रसाद, दुपारी २ वाजता.स्थानिक भजन बुवा श्री ओमकार मेस्त्री, दुपारी ३ ते ६ महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ४ ते १० पर्यंत डबलबारी भजनांचा जंगी सामना बुवा श्री अखिलेश फाळके, विरुद्ध बुवा श्री संदीप पुजारे , रात्री ठीक १० वाजता.कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर सिध्देश कलिंगण यांचा ट्रिकसीनयुक्त व्यंकटेश पद्मावती हा सादर होणार आहे.अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहाव...

सिंधुदुर्ग today

इमेज
ओटव क्रिकेट स्पर्धेत बेळणे संघ विजेता. नांदगाव ऋषिकेश मोरजकर  आदर्श क्रिकेट क्लब ऑटो या च्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना पावना देवी बेळणे विरुद्ध तरंदळे यांच्यात झाला या अंतिम सामन्यांमध्ये पावणादेवी बेळणे संघ विजय ठरला तर तरंदळे संघ उपविजेता ठरला आहे.         विजेत्या संघाला रोख रुपये 15000 हजार व चषक मंडळाच्या वतीने देण्यात आले तसेच उपविजेत्या संघाला रोख रुपये 10,000  हजार व चषक देण्यात आले आहे.        या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओटव सरपंच रुहिता तांबे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.यावेळी ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर,तंटामुक्ती अध्यक्ष जयविंद तांबे ,भैरी भवानी कन्स्ट्रक्शन चे संचालक मंगेश परब, अशोक गावकर,  पोलीस पाटील मंगेश तांबे,शाळा समिती अध्यक्ष संतोष तांबे आदी उपस्थित होते.       ही स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम सर्व आदर्श क्रिकेट क्लब ओटव च्या तरुण मुलांनी घेतल्याने सरपंच रुहिता तांबे यांनी विशेष कौतुक केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
राष्ट्रीय अपंग विकास महासंघ-महाराष्ट्र शाखा सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष पदी सुनील तांबे यांची निवड कणकवली प्रतिनिधी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ-महाराष्ट्र शाखा सिंधुदूर्ग तर्फे सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून कणकवली तालुक्यातील असलदे येथील श्री. सुनील गणपत तांबे  यांची नेमणूक करण्यात आली आहे.        राष्ट्रीय अपंग विकास महासंघ-महाराष्ट्र यांची राज्य स्तरीय सभा नुकतीच भाईंदर-मुंबई येथे पार पडली. राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. मेघाताई काळे, राज्य कार्य अध्यक्ष श्री.सुरेंद्र खरात, राज्य सचिव बाळासाहेब पाटील सर, राष्ट्रीय संपर्क प्रमुख मा. सुहास काळे यांच्या हस्ते  सुनील तांबे यांना सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली. कार्यक्रमास सर्व राष्ट्रीय कार्यकारीणी, सर्व जिल्हा प्रमुख, सर्व जिल्हा संचालक, राज्यतील सर्व अपंग बांधव , अपंग मित्र उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
वेड गड किल्यांच परिवार तर्फे १९ रोजी तोंडवली येथे श्री शिवजन्मोत्सव सोहळा नांदगाव प्रतिनिधी वेड गड किल्यांच परिवार महाराष्ट्र राज्य तर्फे तोंडवली बोभाटेवाडी येथे दरवर्षी प्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त श्री शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे . यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.      यामध्ये सकाळी ठीक ७ वाजता.पालखी पुजन प्रस्थान, सकाळी ७.१५ ते ७. ४५ लाठीकाठी , सकाळी ७.४५ ते ८.०० ढोलवादन , सकाळी ८ ते १० पर्यंत नांदगाव तिठा ते तोंडवली बोभाटेवाडी पालखी मिरवणूक, सकाळी १० ते १०.३० छत्रपती शिवरायांच पुजन व अभिषेक , सकाळी १०.३०  ते ११.३० श्री सत्यनारायण महापूजा,११.३० ते १२ आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ स्थानिक भजने, सायंकाळी ४ ते ६ महिलांसाठी हळदीकुंकू , सायंकाळी ६ ते १० दिंडी भजने , रात्री ठीक १० वा. आरोलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा शिवमहिमा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे गावठण येथे शिवजयंती उत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम नांदगाव प्रतिनिधी  ग्रामविकास मंडळ व शिवसाई मित्र मंडळ असलदे गावठण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आयोजित केला असून त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.         सकाळी ठीक 9 वा. शिवछत्रपती महाराजांचे पुजन, 3 ते 4 महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,4 ते 6 फनिगेम्स् , सायंकाळी 7 वा. विविध कार्यक्रम उद्घाटन ,7.30 वा. शाळेतील मुलांची भाषणे , 9.30 वा. स्थानिक भजन असलदे गावठण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्वांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदेत लोखंडी साहित्य चोरी करताना तिनं महिलांना रंगेहाथ पकडले त्या महिलांना पकडण्यात पोलिस पाटील सावित्री पाताडे यांची महत्त्वाची भूमिका नांदगाव/वार्ताहर        असलदे गावठण येथील  चव्हाट्यावर तीन महिलांना लोखंडी साहित्य चोरी करताना पोलिस पाटील सावित्री पाताडे यांनी रंगेहाथ पकडले.हि माहीती मिळताच संपूर्ण गावकरी जमा होऊन कणकवली पोलिसांना माहिती दिली.हि घटना सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास घडली.     याबाबत मिळालेली माहिती अशी की,आज सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास असलदे पोलिस पाटील सावित्री पाताडे या असलदे चव्हाट्याजवळून  जात असताना तीन महिला चव्हाटा परिसरात संशयास्पद वावरताना दिसल्या.म्हणून पुढे जाऊन विचारपूस केली असता त्यांनी येथील लोखंडी साहित्य चोरी केल्याचे लक्षात आले.त्यामुळे त्यांना रोखून धरत ग्रामस्थांना माहीती देताच संपुर्ण गाव जमा झाला.अधिक चौकशी केली असता चोरलेले लोखंडी साहित्य जवळच्या झाडीत लपवून ठेवल्याचे कबूल केले.यानंतर कणकवली पोलिस स्थानकात माहिती देण्यात आली.        घर परड्यात माणसांची जाग नसल्याचे पाहून लोखंडी...

सिंधुदुर्ग today

इमेज
  एसटी चालकाला मारहाणप्रकरणी रत्नप्रभा वळंजूसह दोघे निर्दोष प्रतिनिधी / कणकवली वारगांव येथील एसटी बस स्टॉपवर प्रवाशांनी हात दाखवूनही बस अर्धा कि.मी. पुढे नेऊन थांबविल्याबाबत बस चालकाला शिवीगाळ करून फोनद्वारे तळेरे स्थानकावर कार्यकर्त्यांना जमण्यास सांगितले. तसेच तळेरे येथे कार्यकर्त्याद्वारे चालकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून तत्कालीन जि.प. सदस्या रत्नाप्रभा वळंजू व तळेरे येथील किशोर भांबुरे यांची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि. १४ ऑगस्ट २०१४ रोजी रत्नागिरी तळेरे मार्गे मालवण जाणारी बस वारगांव येथील बसस्टॉपवर सकाळी ११.३० वा. आली. तेथील प्रवाशांनी बसला थांबण्यासाठी हात दाखविला. परंतु, बस चालकाने सुमारे अर्धा कि.मी. अंतरावर उभी केली. त्यानंतर बसमध्ये चढलेल्या तत्कालीन जि.प. सदस्या रत्नप्रभा वळंजू यांनी बसचालक सुर्यकांत मधुसूदन काणेकर रा. माणगांव ता. कुडाळ याला शिवीगाळ करून जाब विचारला. त्यानंतर चालकाला धडा शिकविण्यासाठी फोनद्वारे कार्यकर्त्याना तळ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव भाजपा पुरस्कृत व इरफान फ्रेंड सर्कल कबड्डी स्पर्धा उद्या. कणकवली प्रतिनिधी नांदगाव येथे भाजपा पुरस्कृत तसेच इरफान फ्रेंड सर्कल नांदगाव आयोजित युवा स्टार नांदगाव भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन उद्या रविवार दिनांक ११  फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी ७.००  वाजता नांदगाव दशक्रोशी मर्यादित  कबड्डी स्पर्धा संपन्न होणार आहे.सलग सहावे वर्ष असून यासाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये ७,७७७ , व्दितीय ४,४४४ तसेच आकर्षक चषक व इतर वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत.यामध्ये  उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई, शिस्तबध्द संघ, अष्टपैलू खेळाडू तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर चषक देण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
ईच्छापूर्ती गणेश मंदिर बावशी येथे माघी गणेश जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम पारंपारीक डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा प्रमोद हर्यान  विरुध्द बुवा प्रकाश पारकर कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील बावशी गावठण येथील ईच्छापूर्ती गणेश मंदिर बावशी पावणादेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळाच्या वतीने माघी गणेश जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.         गणेश जयंती व प्रथम वर्धापण दिनानिमित्त सोमवार दि १२/०२/२०२४ ते बुधवार दि ते  १४/०२/२०२४ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. .  १२/०२/२०२४ सकाळी ९ वा गणेश मुर्तीचे पुजन ,दुपारी १२.३० वा आरती,सायं ५ वा लहान मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम, रात्रौ ८ वा आरती ,रात्रौ ९ वा  महाप्रसाद, रात्रौ १० वा सुस्वर भजने,१३/०२/२०२४ सकाळी ९ वाजता अभिषेक व पुजन सकाळी १०.३० वाजता होमवहन, दुपारी १२वा जन्म उत्सव व महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद , दुपारी ३ वा हळदीकुंकू समारंभ, सायं ४ वा नवस बोलणे व फेडणे, सायं ५ वा पालखी प्रदक्षिणा व दिंडी, सायं ७ वा दिंडी भजन  रात्रौ ८वा  महाआरती...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे येथील तीन मंदिरात चोरी... फंडपेटी फोडत अज्ञात चोरट्याने रोख रक्कम पळवली; चोरट्याने सीसीटीव्ही च्या समोर उलट चालत चकवा देण्याचा  केला  प्रयत्न. कणकवली दि. ९ फेब्रुवारी(ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील असलदे गावातील तीन मंदिरांमध्ये अज्ञात चोरट्याने फंडपेटी फोडत चोरी केली आहे.ही शुक्रवारी घटना मध्यरात्री घडली आहे.चोरट्याने सीसीटीव्ही च्या समोर उलट चालत चकवा देण्याचा प्रयत्न केला आहे.सुमारे १० ते १५ हजार रुपये चोरीला गेले आहेत. यामध्ये असलदे उगवतीवाडी येथील गणेश मंदिर फंड पेटी, माऊली देवी मंदिर फंड पेटी व डामरेवाडी येथील साईबाबा मंदिरातील फंड पेटी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. तिन्ही ठिकाणच्या फंड पेटी फोडून  चोरट्याने आत असलेली रोकड लांबवली आहे. घटनास्थळी पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे दाखल झाले आहेत.ग्रामपंचायत येथून सीसीटिव्ही फुटेज तापासणी केली जात आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली विधानसभा क्षेत्रातून अयोध्या येथे जाण्यासाठी नांदगाव तिठा येथे एकत्र येत आराम बस रवाना.  नांदगाव ते पनवेल तर पनवेल हुन अयोध्या रेल्वे ने होणार प्रवास  जय श्रीराम च्या घोषणांनी नांदगाव परिसर सोडला दणाणून . नांदगाव ऋषिकेश मोरजकर  कणकवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील अयोध्या येथे जाण्यासाठी आज सकाळी नांदगाव तिठा येथे देवगड, कणकवली, वैभववाडी एकत्र येत आराम बस पनवेल पर्यंत रवाना झाल्या आहेत . तर तेथून रेल्वेने प्रवास होणार आहे. भारतीय जनता पार्टी च्या वतीने याचे नियोजन केले आहे.      याचे आमदार नितेश राणेंनी श्रीफळ वाढवून प्रवासाला सुरुवात केली आहे. व सर्वांचा प्रवास सुखकर होण्यासाठी शुभेच्छा ही दिल्या . जय श्री राम च्या घोषणांनी नांदगाव परिसर दणाणून गेला होता.             प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून श्री राम भक्तांसाठी मोफत अयोध्या दर्शन व्यवस्था भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे याचाच भाग म्हणून कणकवली विधानसभा मतदारसंघातून आज सकाळी ९ वा. नांदगाव तिठा येथे एकत्र येत अयोध्या श्री राम भक्त रवाना झाले आहेत.  ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा. नांदगाव किल्ला ते नांदगाव तिठा निघणार  महाराजांच्या मूर्तीची  मिरवणूक. मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने आयोजन  कणकवली प्रतिनिधी  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा १९ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे . हा सोहळा ३६५ दिवस गडकील्यांसाठी झगडणारा गडसंवर्धन करणारा महाराष्ट्र राज्यात उकृष्ट गडकिल्ले संवर्धन या कार्यासाठी २ वेळा पुरस्कार मिळून सन्मानित झालेला मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य { रजि.} सिंधुदुर्ग विभाग यांनी आयोजन केलं आहे. यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेले ४ वर्ष हा  शिवजन्मोत्सव तोंडवली या गावात करत होतो,तरी या वर्षीपासून आपल्या नांदगाव तिठा येथे आयोजित करण्याचे ठरविले आहे .  नांदगाव किल्ला ते नांदगाव तिठा मिरवणूकीने  महाराजांच्या मूर्तीची होणार स्थापना.  नांदगाव किल्ला या ठिकाणी  शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीचे पूजन करून तिथून मूर्ती वाजत गाजत नांदगाव तिठा येथे म...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील विविध विकास कामांचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन. परब आजीला मिळाले हक्काचे सुंदर घर. नांदगाव | ऋषिकेश मोरजकर कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले या विभागाचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढून नवीन रस्त्यांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे यामध्ये नांदगाव बिडयेवाडी येथून रवळनाथ मंदिर पर्यंत जात असलेला रस्ता, सिसयेवाडी रस्ता, नांदगाव मधलीवाडी ते रामेश्वर मंदिर पर्यंत जाणारा रस्ता ,आणि तसेच नांदगाव वाशिनवाडी वाडी येथील सुनंदा परब या आजीचे या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांच्या पुढाकाराने बनवलेल्या सुंदर असे घराचे उद्घाटन ही आज आमदार नितेश राणे यांचे हस्ते संपन्न झाले आहे.          यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, भाजपचे मंडळ तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे,रज्जाक बटवाले, माजी उपसरपंच निरज मोरये, आयनल माजी सरपंच बापू फाटक,कासार्डे सरपंच सौ.नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे,त...

सिंधुदुर्ग today

इमेज
चर्मकार प्रवर्गातील २५,००० हजार युवक - युवतींना आणि महिलांना स्वयंरोजगारांची संधी. लिडकॉम मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत सुवर्ण संधी  सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर)  लिडकॉम मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या चर्मकार प्रवर्गातील युवक युवतींना आणि महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी  सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या करारामुळे तीन वर्षात 25 हजार चर्मकारांना प्रशिक्षण मिळणार आहे.    या करारावर लिडकॉम  व्यवस्थापकीय संचालक श्री धम्मज्योती गजभिये,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे केंद्रप्रमुख तथा राज्य समन्वयक श्री हेमंत वाघमारे यांनी स्वाक्षरी केली आहे.      या प्रशिक्षणात चर्मकार उद्योगातील व्यवसाय योजना, वित्त व्यवस्थापन ,उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि ग्राहक सेवा या सह विविध विषयांचा समावेश असेल . प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षकांना महामंडळाच्या योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.        या करारामुळे चर्मकार प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार यु...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील हायवे हद्द निश्चित करण्यासाठी मोजणी सर्वांना नोटीसा न बजावल्याने रोखली. नांदगाव सरपंच भाई मोरजकर व माजी जि. प. सदस्य नागेश मोरये आक्रमक  नांदगाव ऋषिकेश मोरजकर मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव हद्दीतील आर ओ डब्ल्यू मागणीनुसार आज काही हद्द मोजणी करिता हायवे प्राधिकरण व भुमी अभिलेख प्रतिनिधी आले असता संपूर्ण मोजणी ला शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या नसल्याने या मोजणी ला तीव्र विरोध करत मोजणी सुरू करण्या अगोदरच उपस्थित नांदगाव सरपंच भाई मोरजकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये यांनी मोजणी केलात तर सर्वांना नोटीसा का बजावली नाही. यामुळे अर्धवट मोजणी आम्हाला मान्य नाही अशी भूमिका घेत मोजणी करु नये अशी भूमिका घेतल्याने अखेर अधिकारी यांना मोजणी न करताच माघारी परतावे लागले आहे. याबाबत नांदगाव सरपंच भाई मोरजकर बोलताना म्हणाले की, नांदगाव ग्रामपंचायत च्या माध्यमातून हायवे प्राधिकरण च्या प्रश्नांबाबत 9/ 11/ 2023 रोजी नांदगाव तिठा ब्रिज खाली आमरण उपोषण करण्यात आलं होतं त्यामध्ये विविध मागण्यांचा समावेश होता. त्यापैकीच एक नांदगाव पावाचीवाडी ते नांदगाव तिठा हायवेच्य...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव हायवे संदर्भात आर ओ डब्ल्यू निश्चित करण्यासाठी मोजणी सुरू होण्यापूर्वी रोखली सर्व शेतकऱ्यांना नोटीसा न बजावल्याने पदाधिकारी आक्रमक   नांदगाव ऋषिकेश मोरजकर मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव हद्दीतील आर ओ डब्ल्यू मागणीनुसार आज काही हद्द मोजणी करिता हायवे प्राधिकरण व भूसंपादन प्रतिनिधी आले असता संपूर्ण मोजणी ला शेतकऱ्यांना नोटीसा न बजावल्याने या मोजणी ला तीव्र विरोध करत जोपर्यंत सर्वांना मोजणी नोटीस देत नाही तोपर्यंत मोजणी करायची नाही असा पवित्रा येथील  नांदगाव सरपंच भाई मोरजकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये यांनी भुमिका मांडली आहे यावेळी चंदू खोत,तसेच भुमी अभिलेख प्रतिनिधी उपस्थित आहेत .       यामुळे दिलेल्या 10 गटांतील मोजणी होणार आहे का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.       उपस्थित पदाधिकारी 10 ते 15 दिवसांत एक एक बाजू क्लिअर करून देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
सरस्वती हायस्कूल नांदगाव चित्रकला परिक्षेचा निकाल १००% नांदगाव ऋषिकेश मोरजकर  कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव या माध्यमिक प्रशालेच्या चित्रकला परिक्षेचा निकाल १००% लागला आहे. या परिक्षेसाठी ३१ विद्यार्थी बसले होते पैकी ३१ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तबला परिक्षेत ओम देसाई ने घवघवीत यश मिळवले आहे.यामुळे दहावी बोर्ड परीक्षेत  जादा गुण मिळणार आहेत.विद्यार्थ्यांना विलास तांबे सर यांचे मार्गदर्शनक लाभले ‌आहे.      पाटकर सर , नारकर सर,सावंत श्रीकांत,संजय सावंत यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.इतर शिक्षक- शक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.अध्यक्ष नागेश मोरये व इतर पदाधिकारी व ममुख्याध्याक यांनी यशस्वी विद्यार्था्याचे  अभिनंदन केले.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव वाशिनवाडी मुख्य रस्त्यावर बस स्टॉप थांबा बोर्ड चे अनावरण कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्गालगत असलेल्या नांदगाव वाशिनवाडी मुख्य रस्त्यावर बस स्टॉप विनंती थांबा बोर्ड चे आज अनावरण करण्यात आले आहे .        यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर, मारुती मोरये, सुनील मोरये, पांडू मोरये,नंदू मोरये,संजय मोरये,प्रशांत मोरये , संदेश मोरये, गोविंद मोरये, राकेश मोरये, कृष्णा मोरये आदी वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.