सिंधुदुर्ग today
ओटव क्रिकेट स्पर्धेत बेळणे संघ विजेता.
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
आदर्श क्रिकेट क्लब ऑटो या च्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना पावना देवी बेळणे विरुद्ध तरंदळे यांच्यात झाला या अंतिम सामन्यांमध्ये पावणादेवी बेळणे संघ विजय ठरला तर तरंदळे संघ उपविजेता ठरला आहे.
विजेत्या संघाला रोख रुपये 15000 हजार व चषक मंडळाच्या वतीने देण्यात आले तसेच उपविजेत्या संघाला रोख रुपये 10,000 हजार व चषक देण्यात आले आहे.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओटव सरपंच रुहिता तांबे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.यावेळी ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर,तंटामुक्ती अध्यक्ष जयविंद तांबे ,भैरी भवानी कन्स्ट्रक्शन चे संचालक मंगेश परब, अशोक गावकर, पोलीस पाटील मंगेश तांबे,शाळा समिती अध्यक्ष संतोष तांबे आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम सर्व आदर्श क्रिकेट क्लब ओटव च्या तरुण मुलांनी घेतल्याने सरपंच रुहिता तांबे यांनी विशेष कौतुक केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा